ब्रेकिंग

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मालदाड ते चिंचोली रस्ता पूर्णत्वाकडे

जाहिरात
लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मालदाड ते चिंचोली रस्ता पूर्णत्वाकडे

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून मालदाड ते चिंचोली रस्ता पूर्णत्वाकडे
संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी ग्रामीण विकासाचा ध्यास घेऊन गावोगावच्या विविध रस्ते डांबरीकरण व मजबुतीकरणासह प्रत्येक गावात विविध विकासाच्या योजना पूर्ण केले आहेत. यामुळे संगमनेर तालुका हा विकासाचे मॉडेल ठरला तालुक्यातील उत्तर भागासाठी महत्त्वाचा असणारा मालदाड ते सोनोशी चिंचोली गुरव हा 19 किलोमीटरचा रस्ता लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या पाठपुराव्यातून आता पूर्णत्वाकडे  जात आहे.
जाहिरात

संगमनेर तालुक्याच्या उत्तर भागातील मालदाड, सोनोशी,नान्नज दुमाला, पिंपळे, काकडवाडी, पारेगाव बुद्रुक ,चिंचोली गुरव,देवकवठे,पारेगाव खुर्द या गावांना जोडणारा मुख्य रस्ता म्हणून मालदाड ते चिंचोली गुरव या रस्त्याची ओळख आहे. या रस्त्याच्या कामासाठी तत्कालीन मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने पाठपुरावा करून या 19 किलोमीटरच्या रस्त्या करता 14 कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर करून घेतला होता. याचबरोबर संगमनेर तालुक्यामधील घुलेवाडी फाटा ते गुंजाळवाडी, राजापूर,निमगाव भोजापूर,चिखली रस्ता हा 11 किलोमीटर रस्त्यासाठी नऊ कोटी 17 लाख रुपये, तसेच राजापूर ते चिखली रोड या तीन किलोमीटर रस्त्यासाठी तीन कोटी 73 लाख रुपयांचा निधी यांचाही समावेश होता. यात समवेत निमगाव भोजापूर येथील म्हाळुंगी नदीवरील पुलास तीन कोटी रुपयांचा निधी मिळवला होता. मात्र कोरोना काळानंतर राज्यात सत्तांतर झाले आणि तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी राजकारणासाठी हे कामे व रस्ते रखडवून ठेवले होते.मालदाड – सोनोशी रस्त्यासाठी मालदाड येथील सरपंच गोरख नवले व नागरिकांनी उपोषण ही केले. यानंतर लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी या रस्त्याच्या कामाबाबत विधानसभेत ही याबाबत आवाज उठवला. व तातडीने रस्ता सुरू करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर सप्टेंबर 2023 मध्ये या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली. आता हा रस्ता पूर्णत्वाकडे येत आहे. चिंचोली गुरव आशा पीर बाबा रोड ते मालदाड मार्गे नाशिक – पुणे हायवे असा 19 किलोमीटर लांबीचा हा रस्ता आता पूर्णत्वास येत आहे. नान्नज दुमाला, सोनोशी, मालदाड या गावांमध्ये गावठाण परिसरामध्ये पूर्ण रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. तसेच रस्त्यांच्या दुतर्फा मालदड घाटामध्ये साईड गटार बांधण्यात आली आहे. इतर सर्व ठिकाणी रस्त्यांचे मजबुतीकरण व डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. आवश्यक ठिकाणी मोठमोठे पाईपही टाकण्यात आले आहे. त्यामुळे आता दळणवळणासाठी देवकवठे, चिंचोली गुरव,नान्नज दुमाला, सोनोशी, मालदाड ,पारेगाव बुद्रुक या गावांमधील नागरिकांना दळणवळणासाठी मोठी सोय झाली आहे.लोकनेते बाळासाहेब थोरात यशोधन कार्यालयाच्या माध्यमातून सातत्याने पाठपुरावा  करून हा  उत्तरेकडील महत्त्वाचा रस्ता पूर्णत्वाकडे जात असल्याने मालदाड, सोनोशी, नान्नज,बिरेवाडी, काकडवाडी,पारेगाव,चिंचोली गुरव,देवकवठे या गावातील नागरिकांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!