ब्रेकिंग

कोपरगावात वाढत्या गुन्हेगारीवर आ. आशुतोष काळे आक्रमक

कोपरगावातील चोऱ्या-घरफोड्यांना लगाम घाला; आ.आशुतोष काळेंचे पोलिसांना कडक निर्देश

कोपरगावात वाढत्या गुन्हेगारीवर आ. आशुतोष काळे आक्रमक

जाहिरात -7756405359

कोपरगावातील चोऱ्या-घरफोड्यांना लगाम घाला; आ.आशुतोष काळेंचे पोलिसांना कडक निर्देश

कोपरगांव । प्रतिनिधी । कोपरगाव शहरासह ग्रामीण भागात घरफोड्या, चोऱ्या, चेन स्नॅचिंग, दुकानफोडी तसेच शेतकऱ्यांच्या विहिरीवरील विद्युत मोटारी व केबल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. समृद्धी महामार्गावर प्रवाशांना लुटणे, मारहाण करून पैसे व मौल्यवान वस्तू हिसकावून घेण्यासारख्या घटनांमुळेही नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांच्या सुरक्षिततेशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही. येणाऱ्या दसरा दिपावली सणाच्या पार्श्वभूमीवर गुन्हेगारांच्या मुसक्या आवळून शहरासह ग्रामीण भागात नागरिकांना सुरक्षित वाटेल, असे वातावरण निर्माण करा अशा कडक सूचना आमदार आशुतोष काळे यांनी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे व ग्रामीण पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना दिल्या आहेत.

कोपरगाव शहर आणि तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी शनिवार (दि.१७) रोजी कोपरगाव शहर पोलीस ठाण्याच्या सभागृहात शहर व तालुका पोलिसांची आढावा बैठक घेतली. या प्रसंगी बिघडलेल्या कायदा सुव्यस्थेबाबत पोलिसांना त्यांनी सूचना केल्या.मागील काही महिन्यांपासून कोपरगाव शहर व तालुक्यात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाढत्या चोरीच्या घटनांमुळे नागरिक आणि शेतकरी वर्गात चिंता व्यक्त होत आहे. नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करणे आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित राखणे ही पोलीस प्रशासनाची प्राथमिक जबाबदारी आहे. त्यामुळे चोरीच्या घटनांकडे गांभीर्याने लक्ष देऊन गुन्हेगारांवर तातडीने कठोर कारवाई करावी, असे आ. आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा, बसस्थानक परिसर आणि संवेदनशील ठिकाणांसह ग्रामीण भागात पोलीस गस्त वाढवावी. विशेषतः रात्रीच्या वेळी स्वतंत्र गस्त पथके तैनात करून संशयित व्यक्ती व वाहनांवर बारकाईने लक्ष ठेवावे. महत्त्वाच्या चौकांमध्ये नाकाबंदी करून संशयितांची कसून तपासणी करावी. चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक उपाययोजनांची प्रभावी अंमलबजावणी करावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या.

शहरातील प्रमुख मार्गांवरील बंद किंवा नादुरुस्त सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने दुरुस्त करावेत. उपलब्ध सीसीटीव्ही यंत्रणेचे पोलीस ठाण्यातून प्रभावी नियंत्रण व निरीक्षण करावे. दाखल झालेल्या गुन्ह्यांचा तपास जलदगतीने पूर्ण करून आरोपींचा शोध घ्यावा आणि त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी. गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक निर्माण झाला पाहिजे आणि सर्वसामान्य नागरिकांना निर्भयपणे वावरता आले पाहिजे, यासाठी पोलीस प्रशासनाने ठोस कृती करावी असे आ. आशुतोष काळे यांनी सांगितले. नागरिकांनीही आपल्या परिसरात संशयास्पद हालचाली किंवा व्यक्ती आढळल्यास तातडीने पोलिसांना माहिती द्यावी. कोणतीही घटना घडल्यास तिची तक्रार पोलिसांकडे नोंदविणे आवश्यक आहे. नागरिकांनी पोलिसांना सहकार्य केल्यास गुन्हेगारांचा शोध घेणे आणि गुन्हेगारीला आळा घालणे अधिक सुलभ होईल. तसेच सण-उत्सव व सार्वजनिक कार्यक्रमांचे आयोजन करताना आयोजकांनी आवश्यक त्या शासकीय परवानग्या घ्याव्यात. त्यामुळे पोलीस प्रशासनाला संबंधित ठिकाणी नियमित गस्त घालणे आणि अनुचित प्रकारांना प्रतिबंध करणे शक्य होईल. नागरिकांनी सतर्क राहून पोलीस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.या बैठकीसाठी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष, आजी-माजी नगरसेवक, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.पोलीस वाहनांची संख्या वाढविण्यासाठी पालकमंत्र्यांकडे मागणी करणार

कोपरगाव शहर व ग्रामीण पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध असलेल्या वाहनांची संख्या अपुरी असल्याने गस्त आणि तातडीच्या पोलीस कारवाईवर मर्यादा येत आहेत. ही बाब लक्षात घेऊन जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून कोपरगाव शहर व ग्रामीण पोलिसांसाठी नवीन आणि अतिरिक्त वाहने उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे करणार आहे.-आ. आशुतोष काळे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!