ब्रेकिंग

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पोहेगावच्या रोहमारे पतसंस्थेत सोने तारण कर्ज सुविधेचा शुभारंभ!

प्रति तोळा १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज; आकर्षक व्याजदर, लॉकर सुविधा

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर पोहेगावच्या रोहमारे पतसंस्थेत सोने तारण कर्ज सुविधेचा शुभारंभ!

प्रति तोळा १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज; आकर्षक व्याजदर, लॉकर सुविधा

कोपरगाव । विनोद जवरे । सभासद आणि ग्राहकांच्या आर्थिक गरजांना प्राधान्य देत पोहेगाव (खुर्द) येथील मा. आमदार श्री. दादासाहेब शहाजी रोहमारे पा. ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित यांच्या वतीने दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोने तारण कर्ज सुविधेचा शुभारंभ करण्यात येणार आहे. या नव्या सुविधेच्या माध्यमातून ग्राहकांना सोन्याच्या तारणावर कर्ज उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस असून, सहकार क्षेत्रातील ग्राहकसेवेला नवी दिशा मिळणार आहे.

पतसंस्थेच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेनुसार, सोने तारण कर्ज सुविधेअंतर्गत प्रति तोळा १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत कर्जाची मर्यादा जाहीर करण्यात आली आहे. यामुळे ऐन सणासुदीच्या काळात तसेच विविध कौटुंबिक आणि व्यावसायिक आर्थिक गरजांसाठी ग्राहकांना या सुविधेचा लाभ घेता येणार आहे.

 ग्राहकांसाठी विविध सुविधांची मेजवानी!

सोने तारण कर्ज सुविधेबरोबरच पतसंस्थेच्या वतीने ग्राहकांसाठी विविध आधुनिक आर्थिक सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला आहे. यामध्ये सोने तारण सुविधा, अल्पदरात लॉकर सुविधा, आकर्षक व्याजदराची सुविधा तसेच NEFT/RTGS या डिजिटल बँकिंग सेवांचा समावेश आहे. याशिवाय ग्राहकांना नम्र आणि तत्पर सेवा देण्याचा संस्थेचा प्रयत्न राहणार आहे.सहकार क्षेत्रात ग्राहकांचा विश्वास संपादन करण्यासाठी पारदर्शक व्यवहार, सुलभ आर्थिक सेवा आणि ग्राहकाभिमुख दृष्टिकोन महत्त्वाचा असतो. याच विचारातून पतसंस्थेने सोने तारण कर्ज सुविधेचा विस्तार करण्याचे पाऊल उचलले आहे. या सुविधेमुळे सभासद आणि ग्राहकांना आर्थिक गरजेच्या वेळी उपलब्ध पर्यायांचा उपयोग करता येणार आहे.

 मान्यवरांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा

मंगळवार, दि. २० ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १० ते ११ या वेळेत सोने तारण कर्ज सुविधेचा उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास राष्ट्रसंत जनार्दन स्वामी आश्रम, कोपरगाव येथील मठाधिपती प. पू. महंत स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचे शुभहस्ते उद्घाटन होणार असून, पोहेगाव आश्रमातील श्री श्री १००८ महामंडलेश्वर साध्वी शारदानंदागिरी माताजी यांची उपस्थिती लाभणार आहे.या शुभप्रसंगी सभासद, ग्राहक, हितचिंतक आणि नागरिकांनी सहकुटुंब उपस्थित राहावे, असे आवाहन पतसंस्थेचे चेअरमन, व्हाइस चेअरमन, संचालक मंडळ आणि कर्मचारी वृंद यांच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!