ब्रेकिंग

राहात्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राहात्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

जाहिरात -7756405359
राहात्याच्या विकासासाठी निधीची कमतरता भासू देणार नाही! – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

राहाता । प्रतिनिधी । शहरातील नागरिकांना दिलेल्या प्रत्येक आश्वासनाची पूर्तता करण्याची जबाबदारी आपण पूर्ण करणार आहोत. त्यामुळे शहरातील विकासप्रक्रिया निरंतर सुरू ठेवा. विकासकामांसाठी निधीची कमतरता भासू देणार नाही, अशी ग्वाही जलसंपदा तथा पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

राहाता नगरपरिषदेच्या वतीने शहरात विकसित करण्यात आलेल्या नमो गार्डन, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेअंतर्गत विकसित करण्यात आलेले गार्डन, बालवाडीची इमारत आणि वीरभद्र मंदिरामागील बाजारतळाचे सुशोभीकरण अशा एकूण ९ कोटी २५ लाख रुपयांच्या विकासकामांचे विजयादशमीच्या मुहूर्तावर मंत्री विखे पाटील यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी राहाता नगरपरिषदेच्या लोगोचेही अनावरण करण्यात आले.

या प्रसंगी नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर, उपनगराध्यक्ष विजय सदाफळ, कैलास सदाफळ, मुकुंदराव सदाफळ, भाऊसाहेब जेजूरकर, वीरभद्र ट्रस्टचे जबाजी मेचे, साहेबराव निधाने, गटनेते मुन्नाभाई शाह, गोरख दंडवते, मच्छिंद्र बनकर, राजेंद्र निकाळे, मुख्याधिकारी वैभव लोंढे यांच्यासह सर्व नगरसेवक आणि नागरिक उपस्थित होते.मंत्री विखे पाटील म्हणाले की, मानवतेच्या कल्याणासाठी निर्णय घेण्याबरोबरच त्यांची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. शहराचा विस्तार होत असून नागरिकांच्या अपेक्षाही वाढत आहेत. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन विकासकामे झाली पाहिजेत. कोणी काय टीका करायची, ती करू द्यावी. ‘निंदकाचे घर असावे शेजारी’ असे म्हणत कोण काय बोलते, याकडे दुर्लक्ष करून विकासकामांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला त्यांनी नगरसेवकांना दिला.

कोल्हार येथील शिवस्मारकाचा उल्लेख करताना मंत्री विखे पाटील म्हणाले की, सर्वधर्मीय नागरिकांनी एकत्र येऊन या स्मारकाची उभारणी केली. त्याच धर्तीवर राहाता शहरातही सामाजिक शांतता आणि सलोखा कायम ठेवून विकासकामांना प्राधान्य द्यावे लागेल.मागील तीन वर्षांत शहराच्या विकासासाठी ५६ कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्वच्छ भारत अभियानातून उपलब्ध झालेल्या वाहनांचा उपयोग शहर स्वच्छ ठेवण्यासाठी झाला पाहिजे. श्रीरामपूरच्या धर्तीवर नाल्यांची दुरुस्ती करून त्यांचे सुशोभीकरण करता येईल का, याचा विचार मुख्याधिकारी आणि जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी एकत्रितपणे करावा, अशी सूचना त्यांनी केली. या कामासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर फळबागांना पाणी देण्याची मागणी होत आहे. उपलब्ध पाण्याचा विचार करून आवर्तनाचे नियोजन करावे लागणार आहे. यासंदर्भात गोदावरी कालवा सल्लागार समितीची बैठक २४ तारखेला बोलावण्यात आली असून, त्यामध्ये सविस्तर चर्चा केली जाईल, अशी माहिती मंत्री विखे पाटील यांनी दिली.धरणे भरल्याचे समाधान असले, तरी उपलब्ध पाणीसाठा पुढील नऊ महिने पुरवायचा आहे. दुष्काळी परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असून, पाच हजार रुपयांची अग्रीम मदत देण्यात आली आहे. यापुढेही सरकार शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.नगराध्यक्ष डॉ. स्वाधीन गाडेकर म्हणाले की, शहरात विकासकामे सुरू असल्याने काहींचे स्वास्थ्य बिघडत आहे. मात्र, शहराचे रूप बदलत असून, २०२७ पर्यंत राहाता शहर सुंदर करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. चितळी रोडवरील व्यापारी संकुलासाठी तसेच युवकांसाठी ओपन जिम उभारण्यासाठी निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली. राहाता शहराला जिल्ह्यातील आदर्श शहर म्हणून नावारूपाला आणण्याचा प्रयत्न सुरू असल्याचेही त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!