ब्रेकिंग

स्व. अशोकराव मोरे दूध संस्थेच्या चेअरमनपदी बादशहा वाळुंज तर व्हा . चेअरमनपदी अनिल कर्पे

स्व. अशोकराव मोरे दूध संस्थेच्या चेअरमनपदी बादशहा वाळुंज तर व्हा . चेअरमनपदी अनिल कर्पे
जाहिरात -7756405359
स्व. अशोकराव मोरे दूध संस्थेच्या चेअरमनपदी बादशहा वाळुंज तर व्हा . चेअरमनपदी अनिल कर्पे
संगमनेर । प्रतिनिधी ।  तालुक्यातील अतिशय प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या पिंपळगाव कोंझिरा येथील स्व. अशोकराव मोरे दूध उत्पादक संस्था मर्यादितच्या चेअरमनपदी  बादशहा वाळुंज तर व्हा. चेअरमनपदी अनिल कर्पे, तर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी अक्षय आहेर यांची निवड झाली आहे.

पिंपळगाव कोंझिरा येथील स्व. अशोकराव मोरे दूध उत्पादक संस्था ही संगमनेर तालुक्यातील अग्रेसर दूध संस्थांपैकी एक म्हणून ओळखली जाते. या संस्थेमार्फत दररोज सुमारे पाच हजार लिटर दूध संकलित केले जाते. संस्थेची सुसज्ज व अद्ययावत इमारत असून, परिसरातील दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी ही संस्था महत्त्वाची ठरली आहे.नवनिर्वाचित चेअरमन बादशहा वाळुंज हे संगमनेर तालुका दूध संघाचे संचालक असून, त्यांनी पिंपळगाव कोंझिरा गावचे सरपंच म्हणूनही काम पाहिले आहे. गेल्या तीस वर्षांपासून ते गावच्या नेतृत्वात सक्रिय आहेत. व्हाईस चेअरमन अनिल कर्पे हे उत्कृष्ट दूध उत्पादक शेतकरी म्हणून परिचित आहेत. तर नवनिर्वाचित उपसरपंच अक्षय आहेर हे अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तिन्ही पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे गावातील सहकार क्षेत्र आणि ग्रामविकासाच्या कामांना नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.या सत्कारप्रसंगी बापूसाहेब कर्पे, बादशहा आहेर, विकास आहेर, राजेंद्र मोरे, सुभाष कर्पे, संदीप कर्पे, संगम आहेर, संतोष कर्पे, प्रथितयश कांदा व्यापारी अशोकशेठ कर्पे, ग्रामपंचायत सदस्य दत्तात्रय कर्पे, रोहिदास मोरे, सुनील कर्पे, विजय अडांगळे, मच्छिंद्र खर्डे आदी उपस्थित होते.या तीनही नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे आमदार सत्यजितदादा तांबे, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, एकविरा फाउंडेशनच्या संस्थापक डॉ. जयश्रीताई थोरात, दूध संघाचे माजी चेअरमन व जिल्हा बँकेचे नवनिर्वाचित संचालक रणजितसिंह देशमुख, कारखान्याचे व्हाईस चेअरमन पांडुरंग घुले, संगमनेर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष अजय फटांगरे आणि माजी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे यांनी अभिनंदन करून त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!