साईबाबांच्या १०८ व्या पुण्यतिथीनिमित्त जवळके येथे भक्तिमय भजन सोहळा!

साईबाबांच्या १०८ व्या पुण्यतिथीनिमित्त जवळके येथे भक्तिमय भजन सोहळा!


साईभक्त साईराम महाराज रहाणे यांच्या निवासस्थानी साईनामाचा गजर; परिसरातील सर्व भजनी मंडळांचा सहभाग
कोपरगाव । विनोद जवरे । शिर्डीचे श्री साईबाबा हे लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असून, त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त ठिकठिकाणी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याच भक्तिमय वातावरणात जवळके येथील साईभक्त ह.भ.प. साईराम महाराज रहाणे यांच्या निवासस्थानी श्री साईबाबांच्या १०८ व्या पुण्यतिथीनिमित्त भजन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

या भजन सोहळ्याला परिसरातील सर्व भजनी मंडळांनी उपस्थिती लावून भक्तिमय वातावरणात सहभाग नोंदविला. भजनाच्या माध्यमातून साईबाबांच्या नामाचा गजर करण्यात आला. टाळ-मृदंगाच्या निनादात आणि भक्तिगीतांच्या सुरेल स्वरांत संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला. उपस्थित भजनी मंडळांच्या सदस्यांनी साईनामाचे स्मरण करत भक्तिभावाने भजनसेवा सादर केली.

साईबाबांनी आपल्या जीवनातून श्रद्धा, सबुरी, मानवता, प्रेम आणि सर्वधर्मसमभावाचा संदेश दिला. त्यांच्या विचारांचे स्मरण करत भक्तिमार्गाने समाजात सकारात्मकता निर्माण करण्याचा प्रयत्न अशा धार्मिक सोहळ्यांच्या माध्यमातून केला जातो. साईबाबांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित या भजन सोहळ्यामुळे जवळके परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले.

साईभक्ती, सामूहिक भजनसेवा आणि श्रद्धेचा संगम साधणारा हा सोहळा परिसरातील भाविकांसाठी भक्तिमय पर्वणी ठरला.
परिसरातील सर्व भजनी मंडळांचा सहभाग हे या सोहळ्याचे विशेष आकर्षण ठरले. सामूहिक भजनसेवा, साईनामाचा गजर आणि भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागातून साईबाबांप्रती असलेली श्रद्धा व भक्तिभाव व्यक्त करण्यात आला.



