ब्रेकिंग

आमदाराच्या मागणीची नामदारांकडून दखल

आमदाराच्या मागणीची नामदारांकडून दखल

कालवा सल्लागार समितीची शनिवारी बैठक

कोपरगांव । प्रतिनिधी । गंभीर दुष्काळी परिस्थिती पाहता गोदावरी कालव्यातून किती आवर्तन, कधी मिळणार याची माहिती लाभधारक शेतकऱ्यांना वेळेत होणे गरजेचे होते. त्यामुळे कालवा सल्लागार समितीची बैठक देखील लवकर होणे अत्यंत गरजेचे होते. लाभधारक शेतकऱ्यांची हि अडचण वेळीच ओळखून आमदार आशुतोष काळे यांनी कालवा सल्लागार समितीची तातडीने बैठक घ्यावी असे साकडे राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांना घातले होते. त्या मागणीची जलसंपदा मंत्र्यांनी गांभीर्याने दखल घेवून शनिवार (दि.२४) रोजी कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्याचे आदेश जलसंपदा विभागाला दिले आहेत.

जाहिरात -7756405359

रब्बी हंगामाचे नियोजन करण्याच्या दृष्टीने गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी कालवा सल्लागार समितीची बैठक अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असून दरवर्षी साधारणत: डिसेंबर महिन्याच्या आसपास ह्या बैठकीचे जलसंपदा विभागाकडून आयोजन करण्यात येते. परंतु चालू वर्षी एल निनोमुळे राज्यासह अवर्षणग्रस्त असलेल्या कोपरगाव मतदार संघात अपेक्षित पाऊस पडला नाही. पर्जन्यमानात झालेली मोठी घट त्यामुळे खरीप हंगाम तर तोट्यात गेलाच पण रब्बी हंगामाचे भविष्य देखील टांगणीला लागले आहे. या गंभीर परिस्थितीची दखल घेवून आमदार आशुतोष काळे यांनी गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांना दुष्काळी परिस्थितीत रब्बी हंगामाचे योग्य नियोजन करता यावे यासाठी दरवर्षी साधारणत: डिसेंबर महिन्यात होणारी कालवा सल्लागार समितीची बैठक तातडीने घेण्याची मागणी मागील आठवड्यात राज्याचे जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्याकडे केली होती. त्या मागणीनुसार शनिवार (दि.२४) रोजी कुंदन लॉन्स राहाता येथे कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी गोदावरी कालव्याच्या लाभधारक क्षेत्रातील शेतकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आमदार आशुतोष काळे यांनी केले आहे.

यंदाची दुष्काळी परिस्थिती व पाण्याची मर्यादित उपलब्धता लक्षात घेऊन लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने केलेल्या माझ्या मागणीची दखल घेवून जलसंपदामंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांनी दोन महिने अगोदरच कालवा सल्लागार समितीची बैठक आयोजित करण्याचा घेतलेला निर्णय शेतकऱ्यांना पीक नियोजनासाठी दिशादर्शक ठरणार आहे. शेतकऱ्यांच्या हिताला प्राधान्य देणाऱ्या निर्णयाबद्दल लाभधारक शेतकऱ्यांच्या वतीने जलसंपदामंत्री ना.राधाकृष्णजी विखे पाटील यांचे मनपूर्वक आभार.-आ.आशुतोष काळे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!