ब्रेकिंग

धरणांतील गाळ काढणार, पाणीसाठा वाढविणार; नदीजोड प्रकल्पांना गती देणार – विखे पाटील

जाहिरात -7756405359
धरणांतील गाळ काढणार, पाणीसाठा वाढविणार; नदीजोड प्रकल्पांना गती देणार – विखे पाटील

धरणांतील गाळ काढणार, पाणीसाठा वाढविणार; नदीजोड प्रकल्पांना गती देणार – विखे पाटील

लोणी । प्रतिनिधी । धरणांमधील गाळ काढून साठवण क्षमता वाढविण्याचे धोरण जलसंपदा विभागाने घेतले आहे. कोकणात वाहून जाणारे पाणी नासिक अहील्यानगर आणि जायकवाडी मध्ये वळवून गोदावरीचे खोरे कायमस्वरुपी दुष्काळमुक्त करण्याचे प्रयत्न सुरू झाले असल्याची माहीती जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.वाघाड प्रकल्पस्तरीय पाणी वापर संस्था आणि पालखेड पाटबंधारे विभाग, नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित वाघाड धरण जलपूजन सोहळा व प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेच्या सर्वसाधारण सभेच्या मेळाव्यात ते बोलत होते. दिंडोरी येथील स्वामी समर्थ केंद्राचे प्रमुख गुरूमाउली आण्णासाहेब मोरे यांच्या उपस्थितीत जलपूजन करण्यात आले. औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ अध्यक्षस्थानी होते. या कार्यक्रमास खासदार भास्कर भगरे, दिंडोरीच्या नगराध्यक्ष आशा कराटे, जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता अरुण नाईक, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, उपविभागीय अधिकारी आप्पासाहेब शिंदे, नांदूर मध्यमेश्वरचे कार्यकारी अभियंता मनोज ढोकचवले, वैभव भागवत, कादवा सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, पाणी वापर संस्थेचे अध्यक्ष शहाजी सोमवंशी, तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी सुनील पाटील, उपअभियंता संभाजी पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी, पाणी वापर संस्थांचे पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

मंत्री डॉ. विखे-पाटील म्हणाले की, नाशिक जिल्हा कृषी क्षेत्रात अग्रगण्य असून येथील शेतकरी प्रगतिशील आणि प्रयोगशील आहेत. फळबागा, विविध कृषी प्रयोग आणि शेतीतील आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेतीच्या विकासासाठी पाण्याचे योग्य व्यवस्थापन आणि पाणी वापर संस्थांची प्रभावी भूमिका महत्त्वाची आहे. वाघाड प्रकल्पातील पाणी वापर संस्थेने केलेले काम उल्लेखनीय असून संस्थेला राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांनी पदाधिकारी व शेतकऱ्यांचे अभिनंदन केले.बंद पाणीवापर संस्था पुन्हा कार्यान्वित करण्यासाठी सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घ्यावा.त्यांचे कामकाज नियमित ठेवणे, पाणीपट्टीची वसुली करणे आणि संकलित निधीचा उपयोग संबंधित क्षेत्रातील कालव्यांची दुरुस्ती व देखभालीसाठी व्हावा आशी अपेक्षा व्यक्त करून, पाण्याचा काटेकोर हिशेब आणि उपलब्ध जलसाठ्याचा प्रभावीपणे वापर करून ‘प्रत्येक थेंबाच्या पाण्याचा हिशेब ठेवणे’ ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

धरणातून सोडण्यात येणारे पाणी, त्याचे वितरण आणि प्रत्यक्ष वापर यावर संबंधित यंत्रणेने लक्ष ठेवावे. पाणी वितरणातील त्रुटी आणि अपव्यय रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी कार्यवाही करावी. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचा योग्य उपयोग झाला, तर उपलब्ध जलसाठ्यातून अधिकाधिक क्षेत्राला लाभ मिळू शकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली नदीजोड प्रकल्पाच्या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे.उल्हास गोदावरी प्रकल्पासाठी तीन सर्वेक्षण पूर्ण झाले असून,९१टक्के पाण्याची उपलब्धता होईल आशी माहीती समोर आली आहे.पाण्याचा उपसा करून पाणी नासिक अहील्यानगर आणि जायकवाडी मध्ये आणणे हीच प्राथमिकता असल्याचे विखे पाटील म्हणाले.धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्यामुळे पाणीसाठवण क्षमतेवर परिणाम होत असल्याचे सांगून मंत्री डॉ विखे पाटील म्हणाले की, राज्यातील जलसाठ्यांची क्षमता टिकविण्यासाठी गाळ काढण्याच्या कामाला महत्त्व द्यावे लागेल. वाघाड धरणातील गाळाचे प्रमाण, गाळ काढल्यानंतर वाढू शकणारी पाणीसाठवण क्षमता आणि त्यासाठी आवश्यक उपाययोजना यांचा संबंधित विभागाने अभ्यास करावा. गाळ काढण्याच्या कामासाठी शक्य त्या प्रक्रियेनुसार परवानगी देण्याबाबत कार्यवाही करण्याची ग्वाही देवून, धरणातील गाळ काढल्यास उपलब्ध जलसाठ्याचा अधिक प्रभावी वापर करता येईल आणि सिंचनासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध होण्यास मदत होईल. कालव्यांची दुरुस्ती आणि पाणीगळती रोखणे हे सिंचन व्यवस्थापनातील महत्त्वाचे घटक असल्याचे त्यांनी सांगितले.दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनस्तरावर आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहेत. पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी मुबलक चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने चारा डेपो सुरू करण्यात येणार आहेत. ज्या भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होईल, तेथे आवश्यकते नुसार टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. पाण्याचे योग्य व्यवस्थापन, उपलब्ध जलसाठ्याचे संवर्धन आणि सिंचन व्यवस्थेतील सुधारणा यांच्या माध्यमातून दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे मंत्री डॉ. विखे-पाटील यांनी सांगितले.मंत्री श्री. झिरवाळ म्हणाले की, वाघाड धरणातील गाळ काढण्यासाठी जलसंपदा विभागाने कार्यवाही करावी. धरणातील पाणीसाठ्याची क्षमता वाढविण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना कराव्यात, तसेच धरणाच्या विकासासाठी कृती समिती स्थापन करावी. तसेच वाघाड धरणाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने धरणातील गाळ काढणे, पाणी साठवण क्षमता वाढविणे आणि आवश्यक विकासकामांचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. यासाठी संबंधित विभागांनी समन्वयाने काम करून आवश्यक कार्यवाही करावी, असेही मंत्री श्री. झिरवाळ यांनी सांगितले.वाघाड धरण परिसरातील पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटकांच्या सोयीसाठी विश्रामगृह उभारण्याबाबतही नियोजन करावे. धरणाचा जलसाठा वाढविण्यासोबतच पर्यटन विकासाच्या माध्यमातून परिसराच्या विकासाला गती देण्यासाठी संबंधित विभागांनी प्रस्तावित कामांचा पाठपुरावा करण्याच्या सूचना केल्या.खासदार श्री. भगरे यांचेही भाषण झाले. प्रास्ताविक लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता श्री.राजेश गोवर्धन यांनी करून विविध प्रकल्पांची माहिती दिली.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!