ब्रेकिंग

कै. मारुती (आण्णा) बाळा पा. थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम

कै. मारुती (आण्णा) बाळा पा. थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आज विविध धार्मिक कार्यक्रम

जाहिरात -7756405359

जवळके येथे हनुमान मंदिरात हरी कीर्तनाचे आयोजन; ह.भ.प. अमोल महाराज बडाख यांची कीर्तनसेवा

जवळके । प्रतिनिधी । जवळके (ता. कोपरगाव) येथील कै. मारुती (आण्णा) बाळा पा. थोरात यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त शनिवार, दि. २४ ऑक्टोबर २०२६ रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्त सकाळी १० वाजता श्री हनुमान मंदिर, जवळके येथे हरी कीर्तनाचा कार्यक्रम होणार आहे.

स्थळ : श्री हनुमान मंदिर, जवळके, ता. कोपरगाव, जि. अहिल्यानगर.

या कीर्तनासाठी ह.भ.प. अमोल महाराज बडाख (मालुंजकर) यांची कीर्तनसेवा लाभणार असून, त्यांच्या कीर्तनातून उपस्थितांना आध्यात्मिक विचारांचे श्रवण करण्याची संधी मिळणार आहे. प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित या धार्मिक कार्यक्रमात नातेवाईक, ग्रामस्थ, स्नेहीजन आणि परिसरातील भाविकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन थोरात परिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.

कै. मारुती आण्णा थोरात यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी आणि त्यांच्या आठवणींना अभिवादन करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. समस्त थोरात परिवार व आप्तेष्टांच्या वतीने या पुण्यस्मरण सोहळ्याची तयारी करण्यात आली आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!