ब्रेकिंग

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाचा सत्यजित तांबे यांना पाठिंबा

नाशिक । विनोद जवरे ।

आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक व शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांसह शिक्षण क्षेत्रातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने मोठा पाठपुरावा केला असून त्यांचाच कामाचा वारसा घेऊन कार्यरत असणारे नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालय शिक्षक महासंघाने जाहीर पाठिंबा दिला आहे.

नाशिक येथे कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने सत्यजित तांबे यांना  पाठिंबा जाहीर केला. यावेळी माजी आमदार नानासाहेब बोरस्ते,अध्यक्ष डॉ. प्रा. संजय शिंदे, सचिव प्रा.संतोष फाजगे ,समन्वयक प्रा. मुकुंद आंदळकर ,प्रा. अविनाश तळेकर यांसह धुळे, जळगाव ,नंदुरबार, नाशिक व अहमदनगर येथील विविध जिल्ह्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी बोलताना प्रा. डॉ. संजय शिंदे म्हणाले की ,नाशिक पदवीधर मतदारसंघाला आमदार डॉ. तांबे यांनी कार्यकर्तृत्वातून नवी ओळख निर्माण करून दिली आहे. सातत्याने 54 तालुक्यातील प्रत्येक कार्यकर्ता व मतदारांशी संपर्क ठेवून त्यांनी डॉक्टर, इंजिनियर, वकील, पदवीधर, शिक्षक, निमशासकीय कर्मचारी, उद्योग क्षेत्रातील कर्मचारी यांचे सह अनेक नागरिकांचे प्रश्न मार्गी लावले आहेत.


शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्नांचे निरासन करण्याचा वारसा घेऊन सत्यजित तांबे हे काम करत आहेत. त्यांनी यापूर्वीही जिल्हा परिषद व समाजकारणाच्या माध्यमातून सातत्याने विविध प्रश्न शासन दरबारी मांडून अनेक प्रश्न सोडवले आहेत. आमदार डॉ. तांबे यांचा वारसा घेवून काम करणारे सत्यजित तांबे हे तरुण, अभ्यासू व चळवळीतील धडाडीचे कार्यकर्ते आहेत. समाजकारण व राजकारणातून राज्यभर त्यांचा मोठा दांडगा जनसंपर्क असून त्यांच्या प्रभावी कामामुळे त्यांना विविध संघटनांचा पाठिंबाही  मिळत आहे.

नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणूक ही पूर्ण एकतर्फी झाली असून शिक्षक , शिक्षकेतर कर्मचारी व कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांसाठी सत्यजित तांबे हे नक्कीच पाठपुरावा करणारे सक्षम नेतृत्व असल्याने त्यांना या निवडणुकीत सर्व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत एकमताने पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आहे.

महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) चा ही पाठिंबा

टीडीएफ, शिक्षक भारती सह राज्यभरातील विविध शिक्षक संघटनांनी सत्यजित तांबे यांना नाशिक पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी पाठिंबा दिला असून महाराष्ट्र माध्यमिक शिक्षक संघ (फेडरेशन) ने ही सत्यजित तांबे यांना पाठिंबा दिला असल्याचे पत्र सेक्रेटरी शाळीग्राम भिरूड व अध्यक्ष ज्ञानेश्वर कानडे यांनी सत्यजीत तांबे यांना दिले आहे..

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!