छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर तरुणांसाठी स्फूर्तीदायी – डॉ.जयश्रीताई थोरात
छत्रपती शिवाजी महाराज मंदिर देखावा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी

छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर तरुणांसाठी स्फूर्तीदायी – डॉ.जयश्रीताई थोरात
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर तरुणांसाठी स्फूर्तीदायी – डॉ.जयश्रीताई थोरात
छत्रपती शिवाजी महाराज मंदिर देखावा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी
संगमनेर ( प्रतिनिधी) अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराचा देखावा पाहण्यासाठी व आई तुळजाभवानीचे व महाराजांचे दर्शन घेण्यासाठी संगमनेर शहर व तालुक्यामधील युवक, नागरिक व महिलांची मोठी गर्दी होत असून स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका समितीच्या वतीने उभारलेले मंदिर हे नागरिकांच्या कौतुकाचा विषय ठरला आहे.
संगमनेर हायटेक बस स्थानकावर लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली व युवक आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मंदिराचा देखावा स्वाभिमानी संगमनेर शहर व तालुका मंडळाने साकारला आहे. या मंदिराच्या समोर महाराष्ट्राचे कुलदैवत तुळजाभवानीचे मंदिर हे मोठे आकर्षणाचा विषय ठरला आहे. याच बरोबर संगमनेर बसस्थानकासमोरील मुख्य रस्त्यावर उभारण्यात आलेली कमान सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

मागील दोन दिवस हे शिव मंदिर पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. महाविद्यालयीन युवक युवतीसह शहरातील नागरिक व महिलांनी अगदी रांगेत शिस्तबद्ध पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराज व आई तुळजाभवानीचे दर्शन घेतले आहे.अत्यंत आकर्षक सजावट, ऐतिहासिक व स्फूर्तीदायी कमान, उंच उभारलेले मंदिर, त्यावरील नक्षीकाम, मंदिरावरचे घुमट, आणि शिवाजी महाराजांच्या मंदिरासमोरील तुळजाभवानीचे मंदिर, हा देखावा नजरेत भरणारा आहे. त्याचबरोबर या मंदिराच्या परिसरात करण्यात आलेली रोषणाई व आकर्षक सजावट हा नागरिकांच्या कुतूहालाचा व कौतुकाचा विषय ठरला आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या तिथीनुसार झालेल्या जयंती मध्ये काल भव्य मिरवणूक झाली. यामध्ये लोकनेते बाळासाहेब थोरात, आमदार सत्यजित तांबे डॉ.जयश्रीताई थोरात यांनी सहभाग घेतला.पारंपारिक वाद्य, सहासी खेळ, आणि मिरवणुकीची भव्यता यामुळे हा परिसर शिवमय झाला होता. महिला फेटे बांधून मोठ्या संख्येने उपस्थित होत्या तरुणांनी ही जय भवानी जय शिवाजी या घोषणेने परिसर दुमदुमून दिला होता.
मंदिरासमोर सेल्फी काढण्यासाठी युवकांची मोठी गर्दी
संगमनेर बस स्थानकात उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मंदिराच्या देखाव्यासमोर सेल्फी काढण्यासाठी महाविद्यालयीन युवक व युवतींची मोठी गर्दी होत आहे. दर्शनासाठी येणाऱ्या साहेबांची सुविधा केलेली असून असून सर्वांनी शिस्तबद्ध पद्धतीने घेतलेले दर्शन हे संगमनेर तालुक्याच्या एकीचे दर्शन घडवत आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर तरुणांसाठी स्फूर्तीदायी – डॉ.जयश्रीताई थोरात
छत्रपती शिवाजी महाराज हे संपूर्ण जगाला आदर्शवत आहे. त्यांच्या विचारांवर संगमनेर तालुका काम करत असून लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून उभारलेले हे मंदिर सर्व तरुण व तरुणींना प्रेरणादायी असून समतेचा विचार देणारे आहे.