
थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाची गुरुवारी सांगता

थोरात कारखान्याच्या गळीत हंगामाची गुरुवारी सांगता

या कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना बाबासाहेब ओहोळ म्हणाले की, सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्त्वावर संगमनेरचा सहकार व कारखान्याची वाटचाल सुरू आहे. कारखान्याने यावर्षी विक्रमी उत्पादन करताना ऊस उत्पादकांना प्रति टन तीन हजार रुपये ऍडव्हान्स पेमेंट अदा केले आहे. तर आसावनी व इथेनॉल प्रकल्पाचे विस्तारीकरण केले आहे.

सन 2024 – 25 या गळीत हंगामाचा सांगता समारंभ गुरुवार दिनांक 20 मार्च 2025 रोजी सकाळी 9 वाजता काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा मा. महसूल मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात व सौ.कांचनताई थोरात यांच्या शुभहस्ते व मा.आमदार डॉ.सुधीर तांबे, विधानपरिषद सदस्य आमदार सत्यजित तांबे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये आणि कारखान्याचे चेअरमन बाबासाहेब ओहोळ यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.यावेळी सौ.दुर्गाताई तांबे, बाजीराव पा.खेमनर, ॲड.माधवराव कानवडे, डॉ.जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, सुधाकर जोशी,संपतराव डोंगरे,रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र कडलग,राजेंद्र गुंजाळ, लक्ष्मणराव कुटे, इंद्रजीत भाऊ थोरात, मिलिंद कानवडे, सोमेश्वर दिवटे, सौ.अर्चनाताई बालोडे, मधुकरराव नवले यांच्यासह अमृत उद्योग समूहातील व संगमनेर तालुक्यातील सर्व संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत.तरी या गळीत हंगाम समारंभासाठी सर्व सभासद,शेतकरी, ऊस उत्पादक नागरिक बंधू भगिनी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन व्हा.चेअरमन संतोष हासे सर्व संचालक मंडळ व कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर यांनी केले आहे.