आ.थोरात यांचे प्रयत्नातून निमगाव भोजापुर म्हाळुंगी पुलाकरता 3 कोटींचा निधी
आ.थोरात यांचे प्रयत्नातून निमगाव भोजापुर म्हाळुंगी पुलाकरता 3 कोटींचा निधी
संगमनेर । विनोद जवरे ।
तालुक्यातील रस्त्यांचे डांबरीकरण व मजबुतीकरण कामांसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी 86 कोटी 87 लाख रुपयांचा निधी मिळवला असून याचबरोबर निमगाव भोजापुर येथील म्हळुंगी नदीवरील पुलाकरता 3 कोटी रुपयांचा निधी मिळवला असल्याची माहिती इंद्रजीत भाऊ थोरात व रामहरी कातोरे यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती देताना इंद्रजीत भाऊ थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्याच्या पश्चिम भागातील विविध रस्त्या करता ही आमदार बाळासाहेब थोरात यांनी मोठा निधी मिळवला आहे. याचबरोबर निमगाव भोजपुर येथील महाळुंगी नदीवर पुलाकरता तीन कोटी रुपयांचा निधी अर्थसंकल्पातून आमदार बाळासाहेब थोरात यांनी मिळवला आहे. उंच कडा पादचारी मार्ग, यासह अत्यंत अद्यावत पद्धतीने हा पूल होणार असल्याने नागरिकांना दळणवळणाची मोठी सोय होणार आहे.
संगमनेर तालुक्यात दळणवळणाच्या सोयी करता रस्त्यांच्या जाळ्या बरोबर आमदार बाळासाहेब थोरात यांनी पूलांची मोठी निर्मिती केली आहे. या अंतर्गत प्रवरा नदीवर पाच पूल, तर इतर सर्व नद्या व ओढे नाले यांना जोडणाऱ्या विविध लहान-मोठ्या नद्यांवरही पूल बांधण्यात आले आहे .यामुळे दळणवळणाची चांगली सोय झाली आहे.
निमगाव भोजपुर येथील म्हाळुंगी नदीवर अद्यावत पूल झाल्याने या परिसरातील शेतकरी विद्यार्थी व नागरिकांची सवय होणार असल्याने निमगाव भोजापूर, चिखली ,राजापूर ,डोंगरगाव, जवळेकडलग या परिसरातील नागरिकांनी आमदार बाळासाहेब थोरात यांचे अभिनंदन केले आहे.