डीएसआर सिक्युरटेक कंपनीला ‘महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५’चा सन्मान
संगमनेरचा दिवाकर मोकळचा गौरव

डीएसआर सिक्युरटेक कंपनीला ‘महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५’चा सन्मान
डीएसआर सिक्युरटेक कंपनीला ‘महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५’चा सन्मान
संगमनेर । प्रतिनिधी । सायबर सुरक्षा आणि सॉफ्टवेअर विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल सुप्रसिद्ध डीएसआर सिक्युरटेक या कंपनीला ‘महाराष्ट्र उद्योजकता पुरस्कार २०२५’ प्रदान करण्यात आला. नान्नज दुमाला येथील सामाजिक कार्यकर्ते कैलास मोकळ यांचे सुपुत्र अभियंता दिवाकर मोकळ यांनी केलेल्या कामातून या कंपनीला पुरस्कार मिळाला आहे.

नाशिक येथे झालेल्या भव्य समारंभात हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याप्रसंगी प्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेत्री वर्षा उसगावकर आणि समाधान महाजन (उपआयुक्त, जीएसटी, महाराष्ट्र शासन) यांच्या हस्ते हा सन्मान दिवाकर मोकळे यांना देण्यात आला.
दिवाकर कैलास मोकळ हे नान्नज दुमाला येथील रहिवासी आहे.कैलास मोकळ हे लोकनेते बाळासाहेब थोरात यांचे अत्यंत विश्वासू कार्यकर्ते आहेत. अत्यंत गरीब परिस्थितीतून त्यांनी उच्च शिक्षण घेत हे संपादन केले आहे. डीएसआर सिक्युरटेकचे संस्थापक दिवाकर मोकल, सतीश घोडे (प्रमुख, सॉफ्टवेअर विकास विभाग) आणि कंपनीच्या सीओओ शकुंतला शिंदे यांना सायबर सुरक्षा आणि सॉफ्टवेअर विकास क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यासाठी हा पुरस्कार देण्यात आला. कंपनी सायबर सुरक्षा उपाय, डेटा संरक्षण, नेटवर्क सिक्युरिटी आणि सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट या क्षेत्रात महत्त्वपूर्ण सेवा पुरवत आहे.

दिवाकर मोकळ व त्याच्या सहकाऱ्यांचा झालेल्या गौरवाबद्दल माजी महसूलमंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ.सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ.जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी, सौ.दुर्गाताई तांबे, यांच्यासह नान्नज दुमाला व तळेगाव परिसरातील नागरिकांनी यांनी डीएसआर सिक्युरटेकच्या कार्याचे कौतुक करून त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.