सहकाराचे शिल्पकार :- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात

सहकाराचे शिल्पकार :- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात
सहकाराचे शिल्पकार :- सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात
संगमनेर । विनोद जवरे ।
सहकार हे गोरगरिबांच्या सर्वांगीण विकासाचे साधन आहे.म्हणून सहकारी चळवळीतील ही ग्रामीण विकासाचा राजपथ मानून सहकारातील दिवंगत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरातांनी आर्थिक शिस्त,काटकसर पारदर्शकता,दुरदृष्टी या चतूसुत्रीचा वापर करुन देशात आदर्शवत असा सहकार उभा केला.आज ह सहकार रायात अमृत उद्योग समूह म्हणून दिपस्तंभाप्रमाणे मार्गदर्शन करित आहे.
12 जानेवारी 1928 ला जोर्वे येथे जन्मलेल्या भाऊसाहेब थोरातांनी बालवयात स्वातंत्र्य संग्रामात उडी घेतली.1943 मध्ये स्वातंत्र्य चळवळीत भाग घेतल्यामुळे त्यांना तुरुंगवास झाला याच काळात डॉ.अण्णासाहेब शिंदे यांचा सहवास,अभ्यासू वृत्ती यांचा परभाव भाऊसाहेबांवर पडला.आणि सहकाराच्या क्षेत्रात एका नव्या पर्वाला सुरुवात झाली.1944 संगमनेर व अकोले तालुक्यातील विडी कामगरांच्या युनियनची स्थापना होवून या युनियनच्या सेक्रेटरी पदी भाऊसाहेबांची निवड झाली.येथूनच आंदोलकता व सामाजीक एकता यांचा संगम झाला. 1952 मध्ये भाऊसाहेबांची जोर्वे येथील सोसायटीच्या अध्यक्षपदी निवड झाली.व येथूनच खर्या अर्थाने सहकाराचा पाया रोवला गेला.त्यांनी सहकारी चळवळीत पदार्पन केल्यापासून त्यांच्या डोक्यात कायम शेती व शेतकर्यांच्या विकासाच्या विविध कल्पना होत्या.त्या कल्पनानना त्यांनी मुर्त स्वरुप दिले.लोकांच्या प्रगतीच्या दृष्ठीने सहकार हे अतिशय प्रभावी साधन ठरले.तालुक्यात नवीन उत्साह निर्माण झाला.प्रगतीचे क्षितीजे विस्तारत गेली.गावोगावी नवीन सहकारी संस्था स्थापन झाल्या.संगमनेर व अकोले तालुक्यासाठी एक खरेदी व विक्री संघ हेाता.1956 साली संगमनेर तालुक्यासाठी स्वतंत्र खरेदी व विक्री संघ स्थापन झाला.7 नोव्हेंबर 1958 च्या बैठकीत एकमताने संगमनेर ,अकोले ,सिन्नर या तालुक्यासाठी स्वतंत्र संगमनेर भाग सहकारी साखर कारखाना लिमीटेड या नावाने ठराव मंजूर झाला.
भाऊसाहेबांनी गावोगावी जाऊन शेअर्सची रक्कम गोळा केली.पावने दोन वर्षाच्या नंतर 14 मार्च 1968 रोजी 800 मे.टन गाळप क्षमतेचा सहकारी साखर कारखान्याचा प्रथम गळीत हंगाम संपन्न झाला.सहकारातून हे विकासाचे तंत्र अवलंबवितांना दुरदृष्टीतून दादांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले.शेतकर्यांच्या आर्थिक बलकटी देणार्या कारखान्यातून दारू निर्मीती न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला.काटकसर ,स्वच्च कारभार, पारदर्शकता, आर्थिक सिस्त यातुनच कारखान्याची प्रगती दिवसेंदिवस वाढत गेली. कारखान्याच्या माध्यमातून विविध सहकारी संस्थांची निर्मीती झाली शेती व्यवसायाला जोड असणार्या दुध धंद्यासाठी पुन्हा गावेगावी दूध सोसायट्या काढल्या गेल्या व यातून संगमनेर तालुका सहकारी दुध संघाची स्थापणा झाली.शेतकी संघाची आर्थिक उलाढाल वाढली.राजहंस अंग्री कंपणी,शॅम्प्रो,गरुड कुकुट्टपालन,संगमनेर अॅग्रीकल्चर प्रोड्यूस कंपनी,अमृतवाहिनी बँक,अशा विविध शिखर संस्थासह तालुक्यात सेवा सोसायट्या,पतसंस्था व दुधसंस्थांची मोठे जाळे निर्माण झाले.

संगममनेर तालुक्यात सहकार वाढवितांना अ.नगर जिल्हा बँकेत त्यांनी महत्वाचे योगदान दिले.सलग 48 वर्षे ते या बँकेचे सभासद राहिले.शेतकर्यांच्या विकासासाठी जिल्हा बँक कामधेनू ठरली.दुरदृष्टीतून शेतकर्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतांना त्यांची 1981 मध्ये महाराष्ट्र राज्य बँकेच्या अध्यक्षपदी निवड झाली.सहकारी संस्था लोखाभिमुख होण्याचा एक नवा अध्याय देशात सुरु झाला. सहकार हेच कार्यक्षेत्र मानून पुढे भाऊसाहेबांनी अखेरच्या श्वासापर्यंत सहकाराची सेवा केली.तालुक्यात सहकार वाढत असतांना शेतकरी .कामगार,गोरगरिब.कष्टकरी यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी त्यांनी सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक महाविद्यालयाची स्थापणा केली.या अंतर्गत आज 34 महाविद्यालय 11 कनिष्ठ महाविद्यालय व 3 वरिष्ठ महाविद्यालये कार्यरत आहेत.उच्च शिक्षणाची संधी तालुक्यात उपलब्ध करुन देण्यासाठी अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास या संस्थेची 1983 मध्ये स्थापना केली.तंत्रनिकेतन.एमबीए,फार्मसी,आयटीआय, मॉडेलस्कूल,इंटरनॅशनल स्कूल या संस्था गुणवत्तेने राज्यात अग्रमानांकित ठरल्या आहे.इंजिनिअरिंग कॉलेजल्या देशातील पहिल्या दहा मधील मानांकन मिळाले आहे. तालुक्याच्या विकासासाठी कामधेनू असणार्या सहकारी साखर कारखान्याने कायम उच्चांकी भाव दिला देवून इतरांपुढे आदर्श निर्माण केला.सहकामुळे संगमनेरची बाजारपेठ फुलली असून अहमदनगर जिल्ह्यातील मोठी बाजारपेठ म्हणून तिचा गौरव होत आहे.संगमनेर तालुक्याच्या विकासाचे मुळ हे येथील निष्क्रीय सहकार असल्यामुळे संगमनेर तालुका आज सर्वच क्षेत्रात अग्रेसर आहे.