ब्रेकिंग

सततच्या कामातून तालुक्याची अर्थव्यवस्था व बाजारपेठ समृद्ध – आमदार थोरात

बंधू भावाच्या वातावरणातून संगमनेरच्या बाजारपेठेत समृद्धी

सततच्या कामातून तालुक्याची अर्थव्यवस्था व बाजारपेठ समृद्ध – आमदार थोरात

बंधू भावाच्या वातावरणातून संगमनेरच्या बाजारपेठेत समृद्धी

आमदार बाळासाहेब थोरात यांनी कधीही भेदभाव केला नाही. शहरात चांगले वातावरण रहावे . यासाठी सातत्याने काम केले असून कुटुंबप्रमुख म्हणून प्रत्येक संगमनेरकरांना त्यांचा अभिमान आहे . ते आमच्यासाठी पक्ष किंवा राजकारण नसून संपूर्ण संगमनेरकरांची भावना असल्याचे गौरवउद्गार डॉ. संजय मालपाणी यांनी काढले आहे

संगमनेर । प्रतिनिधी ।
राज्यात मिळालेल्या संधीचा उपयोग तालुक्याच्या विकासासाठी आपण सातत्याने  केला आहे. विविध संस्था व व्यवसायांमधून ग्रामीण भागातील कुटुंबांमध्ये अर्थव्यवस्था मजबूत झाली आहे. याचा लाभ बाजारपेठेत होत असून चांगले बंधू भावाचे वातावरण याचबरोबर तालुक्याची चांगली अर्थव्यवस्था यामुळे संगमनेरच्या बाजारपेठेत समृद्धी आली असून ती सर्वांसाठी अभिमानास्पद असल्याचे प्रतिपादन काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी काढले असून संगमनेर तालुक्यातील बँकांमध्ये साडेआठ हजार कोटींच्या ठेवी असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

मालपाणी लॉन्स येथे व्यापारी बांधवांशी संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते .यावेळी व्यासपीठावर मा आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ संजय मालपाणी, डॉ जयश्रीताई थोरात, रणजीतसिंह देशमुख ,व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष योगेश कासट ,सुधाकर जोशी, निलेश जाधव, प्रकाश कलंत्री, ओंकार  भंडारी, सोमेश्वर दिवटे ,के.के थोरात ,सुभाष ताजने ,कल्पेश मेहता, कैलास सोमानी, राणी प्रसाद मुंदडा आदींसह संगमनेर शहरातील विविध व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील जनतेचे प्रेम आणि नेतृत्वाचा विश्वास यामुळे सलग 9 व्यांदा विधानसभेत काम करण्याची संधी मिळत आहे. राज्य पातळीवर आणि राष्ट्रीय पातळीवर मोठी संधी मिळाल्याने या संधीचा उपयोग संगमनेर तालुक्याच्या विकासासाठी आपण केला आहे.

संगमनेरकरांचा सन्मान वाढेल असे राज्यात काम केल्याने चंद्रपूर ते पालघर कुठेही गेले तरी संगमनेरचा आदर केला जातो. राजकारणात सुद्धा आपण राज्याला दिशादर्शक अशी संस्कृती निर्माण केली आहे.  पसायदान आणि राज्यघटनेवर आपला विश्वास असून निवडणूक संपली की सर्वांना सोबत घेऊन आपण काम करतो.शांतता सुव्यवस्था असेल तर सर्व आनंदाने चालते. हे सलोख्याचे बंधू भावाचे वातावरण आपले जपले आहे. काही मंडळी शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात दोशी असेल त्याच्यावर कठोर कारवाई झालीच पाहिजे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या घटनांमधील दोषी कोण आणि घटना घडवणारे कोण, त्याचा राजकीय फायदा घेणारे कोण हे तपासून पहा याचबरोबर संगमनेर तालुक्यातील सहकारी बँका पतसंस्था यामध्ये 8537 कोटींच्या ठेवी असून जगभरातील सर्व बँका संगमनेर मध्ये आहेत .तालुक्यातून साडेनऊ लाख लिटर दूध उत्पादन होत असून सहकारी संस्था नोकरदार पोल्ट्री व्यवसाय फळबागा यामधून मोठी आर्थिक उलाढाल शहरांमध्ये होत असते. संगमनेर मधील शेतकरी, व्यापारी प्रामाणिक असून येथे आनंदाचे वातावरण आपल्याला टिकवायचे आहे.
आपण कधीही विरोधासाठी विरोध केला नाही .विरोधकांना सुद्धा मदत केली. विरोधकांचे कृषी महाविद्यालय.मेडिकल कॉलेज हे आपण दिले आहे अडथळे निर्माण केले नाही यामुळे अनेक बाहेरील विद्यार्थी संगमनेर आले अर्थव्यवस्था फुलली या सर्व जमेच्या बाजू आहेत. हे वातावरण आपल्याला टिकवण्यासाठी एकत्र येऊन काम करायचे आहे ही संस्कृती आपल्याला पुढे न्यायची असल्याचे ते म्हणाले . तर डॉ.संजय मालपणी म्हणाले की, निळवंडे धरण व कालवे हे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केली असून तालुक्यातील प्रत्येक व्यक्ती त्यांच्यावर प्रेम करते. सहकारांमध्ये आपला तालुका उत्कृष्ट असून विस्ताराने मोठा असूनही शैक्षणिक संस्था आणि चांगले वातावरण यामुळे संगमनेरचे नाव राज्य पातळीवर गेले आहे. आमदार बाळासाहेब थोरात राजकीय पक्षाचे नसून संगमनेर तालुक्याच्या विकासाचा विचार असल्याचे त्यांनी म्हटले.यावेळी प्रकाश कलंत्री, विवेक कासार, चेतन कर्डिले, केके थोरात ,निलेश जाधव, विजय राहणे, योगेश कासार, ओंकार मंडळी आदींची भाषणे झाली
यावेळी संगमनेर शहरातील व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!