ब्रेकिंग

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 28 व 29 एप्रिल रोजी अमृत एक्सपो आयोजन

अमृतवाहिनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये 28 व 29 एप्रिल रोजी अमृत एक्सपो आयोजन
संगमनेर । विनोद जवरे
विद्यार्थ्यांना संशोधनात प्रोत्साहन मिळावे याकरता अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने शुक्रवार दिनांक 28 एप्रिल व शनिवार दिनांक 29 एप्रिल 2023 अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेल्या महाविद्यालयीन पातळीवरील प्रकल्प साधने करण्याची अमृत एक्सपो 2023 भव्य स्पर्धा आयोजित करण्यात आले असल्याची माहिती प्राचार्य डॉ. एम ए वेंकटेश यांनी दिली आहे.


याबाबत अधिक माहिती देताना डॉ.व्यंकटेश म्हणाले की, काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी महाविद्यालयाने ग्रामीण भागात असूनही गुणवत्तेत देशात अग्रक्रम राखला आहे. मागील वर्षात कॅम्पस इंटरव्यू मधून महाविद्यालयातून 451 विद्यार्थ्यांना विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये थेट नोकरीच्या संधी मिळाल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाबरोबरच त्यांच्या संशोधनास प्रोत्साहन देण्याकरता  28 व 29 एप्रिल रोजी महाविद्यालयीन पातळीवरील प्रकल्प सादरीकरणाची अमृत एक्सपो 2023 ही भव्य स्पर्धा होणार आहे. याकरता नामांकित कंपन्यांकडून दीड लाख रुपयेची बक्षिसे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. तसेच तंत्रनिकेतनच्या शेवटच्या वर्षाच्या विद्यार्थ्यांकरता अभियांत्रिकी मधील नवनवीन संकल्पना व त्यांचे प्रात्यक्षिक सादरीकरण विनामूल्य खुले असणार आहे .

या प्रकल्पामध्ये दूध काढण्याचे यंत्र, कांदा कापणी यंत्र, कमी किमतीचे बांबू घर याबाबत चे प्रात्यक्षिकही दाखवले जाणार आहे .तसेच सॉफ्ट स्किल, व्यावसायिक करिअर बाबत मार्गदर्शनही मिळणार आहे. यामधील प्रथम ,द्वितीय व तृतीय क्रमांक येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी 5000, रू. 3000 रुपये व 2000 रुपयांची रोख रक्कम ट्रॉफी आणि सर्टिफिकेट दिले जाणार आहे.या नावीन्यपूर्ण उपक्रमाबद्दल आ मदार बाळासाहेब थोरात, मा.आ.डॉ सुधीर तांबे, विश्वस्त सौ शरयुताई देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी अभिनंदन केले आहे
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!