ब्रेकिंग

आ. थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील 12000 विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाचे स्टेपॲप मधून मोफत शिक्षण

आ. थोरात यांच्या संकल्पनेतून तालुक्यातील 12000 विद्यार्थ्यांना गणित व विज्ञानाचे स्टेपॲप मधून मोफत शिक्षण

संगमनेर । विनोद जवरे ।

राज्याचे माजी शिक्षणमंत्री व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका हा शिक्षणाचे हब बनला आहे. मागील वर्षी तालुक्यातील 28 शाळांमधून सुमारे 12000 विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम स्टेपॲपच्या माध्यमातून मोफत शिक्षण दिले असून यावर्षी पेस कोचिंग इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून अकरावी व बारावीच्या 2000 विद्यार्थ्यांना मोफत ऑनलाइन मार्गदर्शन असल्याची माहिती कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी दिली आहे.

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात महाविद्यालयातील के.बी. दादा सभागृहात पेस आयआयटी व मेडिकल यांच्या वतीने आयोजित  गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांना प्रशिक्षण आयोजित केले . यावेळी नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ सुधीर तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, पेस कोचिंग क्लासेस चे प्रवीण त्यागी आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

माजी शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी तालुक्यातील जिल्हा परिषद सह सर्व शाळा व महाविद्यालयांमधून अत्यंत गुणवत्ता पूर्ण शिक्षण दिले जावे यासाठी विशेष पॅटर्न राबवला आहे. विद्यार्थ्यांमध्ये गणित व विज्ञान विषयाची भीती असून ती कमी करण्याकरता आमदार थोरात यांचे स्नेही असलेले जागतिक कीर्तीचे शिक्षणतज्ञ प्रवीण त्यागी यांच्या सहयोगातून स्टेप ॲपचा ग्रामीण भागातील पहिला पॅटर्न संगमनेर तालुक्यामध्ये राबवलेला आहे. यामध्ये सह्याद्री शिक्षण संस्थेच्या 28 शाळा, अमृतवाहिनी मॉडेल स्कूल ,इंटरनॅशनल स्कूल, जयहिंद आदिवासी आश्रम शाळा या विद्यालयांचा समावेश असून यामधून सुमारे 12000 विद्यार्थ्यांना गणित व विज्ञान विषयाचा अभ्यासक्रम मोफत शिकवला जात आहे. प्रवीण त्यागी हे आमदार बाळासाहेब थोरात यांचे स्नेही असून त्यांची अनेक माजी विद्यार्थी आयपीएस आयएएस झालेले असून विविध आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये उच्चपदस्थ पदांवर कार्यरत आहेत.स्टेपॲप हे कॉम्प्युटर गेम आधारित शिक्षण पद्धती आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना सहजतेने व आवडीने हे हाताळता येणार आहे.

यावर्षी पेस कोचिंग इन्स्टिट्यूट च्या माध्यमातून अकरावी व बारावीच्या 2000 विद्यार्थ्यांकरता आयआयटी ,जेईई व नीट परीक्षेच्या तयारी करिता आयआयटी आणि मेडिकल मधील अनुभवी शिक्षकांद्वारे  मोफत ऑनलाईन कोचिंग प्रदान करण्यात येणार आहे. याप्रसंगी बोलताना मा आ.डॉ. तांबे म्हणाले की, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना या कोचिंग क्लास मुळे स्पर्धात्मक परीक्षेसाठी तयारीची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. मुंबई, पुणे, नाशिक येथे जाऊन मोठ्या क्लास वर खर्च करण्यापेक्षा संगमनेर मध्ये ही अत्यंत गुणवत्तेची अद्यावत शिक्षण प्रणाली सुरू झाली असल्याने पालकांनी व शिक्षकांनी त्याचा लाभ घ्यावा असे आवाहन त्यांनी केले.तर कॅन्सर तज्ञ डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, शिक्षकांनी विद्यार्थ्यांची संवाद साधताना सहजतेने होईल याकरता या ॲपचा नक्कीच फायदा होणार आहे .या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांची गणित व विज्ञान विषयाचे ज्ञान पक्के झाल्याने त्यांच्या करिअरमध्ये अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. याचबरोबर आयआयटी, जेईई, नीट या परीक्षेची पूर्वतयारी ही जागतिक दर्जाच्या शिक्षकांकडून संगमनेर मधील विद्यार्थ्यांना मोफत मिळणार असल्याने त्यांचे इंजिनिअरिंग मेडिकलला जाण्याची स्वप्न पूर्ण होणार आहे. यावेळी पेस प्रमुख डॉ.प्रवीण त्यागी स्टेप ॲप संकल्पना समजून सांगताना शिक्षकांना सहज शिकवण्याच्या पद्धती व नवीन तंत्रज्ञानाची अद्यावत माहिती प्रात्यक्षिकांसह समजावून सांगितले.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन संतोष कर्पे यांनी केले

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!