साई बाबा संस्थान सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक पणाचे दर्शन
साई बाबा संस्थान सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांच्या प्रामाणिक पणाचे दर्शन
शिर्डी । विनोद जवरे ।
जगप्रसिद्ध श्री साईबाबा देवस्थान शिर्डी येथे दररोज लाखो भाविक भक्त जगाच्या कानाकोपऱ्यातुन येत असता त्यामुळे मोठ्या प्रमाणात नेहमीच गर्दी असते या गर्दीत अनेक भाविकांच्या मौल्यवान वस्तू गहाळ होत असतात असेच २ प्रसंग नुकतेच साई बाबा संस्थान परिसरात उघडकिस आला असून यातुन साईबाबा संस्थान च्या सुरक्षा कर्मचाऱ्यांचा प्रामाणिक पणा सामोरे आला आहे.
भाविकांनी आपापले मौल्यवान वस्तू पाकिटे दागिने मोबाईल काळजीपूर्वक सांभाळावे तसेच परिसरात कोणी संशयास्पद हालचाली अथवा कोणी आढळून आल्यास तात्काळ पोलिस अथवा सुरक्षा रक्षकासोबत संपर्क साधावा.
रोहिदास माळी
मंदिर सुरक्षा प्रमुख
सविस्तर वृत्त असे की, दिनांक १५ ऑगस्ट रोजी मंदिर महाद्वार महिला सुरक्षा रक्षक कल्पना दळवी यांना समाधी मंदिर गाभाऱ्यामध्ये १९ हजार ४४० रुपये किंमतीचे २.७०० ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातील एक झुबा सापडला असता ते त्यांनी संरक्षण ऑफिसमध्ये जमा केले. तदनंतर साईभक्त यांनी संरक्षण ऑफिस ला येऊन दागिना हरविल्याची तक्रार केली असता, ओळख पटवून वरील किमतीचा सोन्याचा दागिना भक्तांना परत केला. नमूद महिला या कंत्राटी कर्मचारी म्हणून संस्थान मध्ये कार्यरत आहेत. त्यांच्या महिन्याच्या पगाराचे बरोबरीचे किमतीचे सोन्याचा दागिना त्यांनी कुठलाही मोह न ठेवता परत केले. प्रामाणिक महिला कर्मचारी यांचे श्री साईबाबा संस्थान चे मुख्य कार्यकारी गोरक्ष गाडीलकर व उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवले यांनी अभिनंदन केले.
तर दुसऱ्या घटनेत दिनांक १६ ऑगस्ट रोजी साईबाबा हॉस्पिटल मधील एक्स रे विभागाचे श्री साईबाबा संस्थान चे सुरक्षा सुपरवायझर नानासाहेब अहिरे यांना एक पैशांचे पाकीट मिळून आले असता त्यात ९४२० रुपये रोख आणि एक युनियन बँकेचे एटीएम कार्ड होते. त्यांनी ते पाकीट प्रामाणिकपणे संरक्षण ऑफिस ला जमा केले असता मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांनी नमूद एटीएम कार्ड ची माहिती, यूनियन बँकेतुन मागविली असता ते पाकीट राजशेखर शिवाजीराव कुलकर्णी, रा. जालना यांचे असल्याचे समजले, बँकेतील मित्राने त्यान्चा मोबाईल नंबर मंदिर सुरक्षा प्रमुख रोहिदास माळी यांना पाठवली. त्यावर संपर्क केला असता, ते साईबाबा हॉस्पिटल चे जनरल वॉर्ड मध्ये ऍडमिट होते. तेथे जाऊन त्यांचे पैसे आणि कार्ड परत केले. तेव्हा ते म्हणाले कि, इथे एवढी गर्दी आहे कि, मला माझे पैसे परत भेटतील असे वाटले नव्हते, परंतु साईबाबाची लीला आहे. साईबाबा संस्थान चा मनापासून आभारी आहे, असे म्हणतांना ते क्षणभर भावुक झाले.