ब्रेकिंग

शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक संपन्न

शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची भव्य मिरवणूक संपन्न

कोपरगाव । विनोद जवरे ।

संजीवनी मंत्राचे उगम स्थान असलेल्या कोपरगाव शहरातून वाहणाऱ्या पवित्रा अशा गोदावरी नदीकिनारी वसलेल्या जिथे कोणतीही शुभ कार्य करण्यास मुहूर्त लागत नाही असे पवित्र शुक्राचार्य महाराज मंदिरात नव्याने प्राणप्रतिष्ठा करण्यात येत असलेल्या परम सद्गुरु शुक्राचार्य महाराजांच्या मूर्तीची संपूर्ण कोपरगाव शहरातून भव्य दिव्य अशी वाजत गाजत साधू महंतांच्या उपस्थितीत रविवारी १८ ऑगस्ट रोजी मिरवणूक सोहळा संपन्न झाला.


या मिरवणूकीत पंचवटी नाशिक येथील श्री पंचमुखी हनुमान मंदिर ट्रस्ट आखाडा परिषदेचे प्रवक्ते महंत श्री भक्तीचरणदासजी महाराज, श्री गोरेराम मंदिर पंचवटी नाशिक येथील महंत श्री रामदासजी महाराज, पंचवटी येथील श्री हनुमान मंदिराचे महंत श्री बालकदासजी महाराज, तपोवन येथील महंत श्री चंदनदासजी महाराज, नाशिक येथील महंत श्री पद्मचरणदासजी महाराज, श्री संत जनार्दन स्वामी समाधी स्थान बेट कोपरगाव आश्रमाचे मठाधिपती महंत श्री रमेशगिरीजी महाराज, कुंभारी येथील राघवेश्वर आश्रमाचे मठाधिपती श्री राघवेश्वरानंदगिरीजी महाराज ,श्री साध्वी शारदा माता देवी आधी संत महंतासह सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष विवेकभैय्या कोल्हे, अमृत संजीवनीचे चेअरमन पराग संधान, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश प्रवक्ते संदीप वर्पे आदींसह शहरातील महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यार्थिनी तसेच शुक्राचार्य महाराज भक्त परिवार मोठ्या संख्येने सहभागी झाला होता.तर संपूर्ण मिरवणूक सोहळा यशस्वीतेसाठी परम सद्गुरु शुक्राचार्य महाराज ट्रस्ट समिती पदाधिकारी सदस्य तसेच शुक्राचार्य भक्तांनी अथक परिश्रम घेतले

.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!