सप्ताहाच्या चौथ्या दिवशी पाच लाख भाविकांची उपस्थिती
सव्वा लाख लिटर आमटी व 50 ट्रॅक्टर भाकरीचा महाप्रसाद" कोपरगाव ।
सप्ताहाच्या चौथ्या दिवशी पाच लाख भाविकांची उपस्थिती
सव्वा लाख लिटर आमटी व 50 ट्रॅक्टर भाकरीचा महाप्रसाद”
कोपरगाव । विनोद जवरे ।
सत्संग विरहित जीवन असेल तर व्यक्ती बिघडतो चातक पक्षी पावसाची वाट बघतो त्यामुळे जीवनामध्ये निवड कोणाची करायची हे महत्त्वाचे असते शब्दांमध्ये सायचे नसते छळ कपटी कुसंगती व्यक्ती समाजाला लायक होऊ शकत नाही. एका दोषामुळे अनेक दोषांचा माणसांमध्ये शिरकाव होतो उत्तर रामायण एकनाथ महाराजांनी लिहिले .प्राप्त केलेले ज्ञान चिरकाल टिकत नाही प्रकट केलेला ज्ञान यथार्थ ठरते .त्यामुळे मनुष्याने जीवन जगताना दुसऱ्या प्रती सहानुभूती दया माणुसकी या गुणांचा अवलंब केला तर सर्व धर्म समभाव हे तत्व समाजाला लागू होईल व एक सुसंस्कृत समाज तयार होऊन एक सुसंस्कृत पिढी तयार झाल्यास लाखो व्यक्तींना त्याचा फायदा होऊ शकतो हेच कार्य गंगागिरी महाराज यांनी केले व त्यांचा वसा पुढे चालू ठेवण्यासाठी 177 वा वार्षिक नारळी फिरता सप्ताह आयोजन करण्याचा उपक्रम सुरू आहे .या कार्यक्रमास भाविकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग वाढला असून जनतेचे जीवन सुधारण्यासाठी संत सदैव प्रयत्नशील असतात त्यामुळे प्रत्येक संतांच्या कार्याचा आदर्श प्रत्येक व्यक्तीने घेतला पाहिजे **असे मत हरिभक्त महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले .
झालेआज पंचाळे तालुका सिन्नर येथे आयोजित गंगागिरी महाराजांच्या 177 व्या सप्ताहाचा चौथा दिवस व प्रवचनाचे तिसरे पुष्प होते त्यावेळी गंगा रामगिरी महाराज यांचे प्रवचन झाले** आज-काल सर्वांचे जीवन संकुचित झाले असून भजन करणाऱ्या मुलाच्या आईला मुलगा बाबा होण्याची भीती असते त्यामुळे आत्मिक आनंद मिळत असतानाही त्यापासून दूर करण्याचा प्रयत्न अनेक जण करत असतात भजन साधनेतून भक्ती मिळते भगवंताची भूकही शिळ्या भाकरीसारखी असते समोर जिलेबी लाडू गोड पदार्थ ठेवले परंतु डायबिटीज चा व्यक्ती तो खाऊ शकत नाही जे कष्ट करतात ते शेतात झोपले तरी त्यांना शांत पूर्ण झोप लागते परंतु बंगल्यामध्ये उंची उंची गाद्यांवर झोपणाऱ्या लोकांना झोपेच्या गोळ्या घ्याव्या लागतात त्यामुळे सध्याच्या काळामध्ये मानसिकता हरवली असून लोकांना मध्ये परमेश्वर भक्तीचे रस निर्माण करण्यासाठी कीर्तन भजनांची प्रवचनांची आवश्यकता असल्याचे मत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
गर्दीचा उच्चांक पंचाळे येथील सप्ताह चौथा दिवस होता यानिमित्ताने पाच लाख भाविक या सप्ताहासाठी हजर होते .
सव्वा लाख लिटर आमटी
यावेळी सव्वा लाख लिटर आमटी बनवण्यात आली .50 ट्रॅक्टर भाकरी यासाठी वार्षिक पंक्ती देणाऱ्या गावांनी तसेच सिन्नर तालुक्यातील अनेक गावांनी आणल्या होत्या
मान्यवरांची उपस्थिती
या सप्ताहास आज कोपरगावच्या माजी आमदार स्नेहलता कोल्हे, विश्राम महाराज ढमाले, रामकृष्ण महाराज लहवितकर, क्रांतीसुर्य हरिभक्त परायण भास्कर महाराज भाईक( पारनेर), श्रीरामपूर पंचायत समितीच्या माजी सभापती डॉक्टर वंदनाताई मुरकुटे, हरिभक्त परायण शिवाजी महाराज तळेकर मधुकर महाराज, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस डॉक्टर झाकीर शेख ,निमाचे माजी संचालक राजेश गडाख ,अशोक महाराज घुमरे, नांदगावचे माजी आमदार अनिल आहेर ,शहाच्या स्वामी समर्थ केंद्राचे संचालक संतोष जाधव, प्रणव नंदगिरीजी महाराज,(त्रंबकेश्वर) हे उपस्थित होते. सप्ताह कमिटीचे अध्यक्ष संभाजी जाधव ,अरुण थोरात, कैलास थोरात गणेश थोरात आनंदा थोरात राजेंद्र डुंबरे छबुराव थोरात यांनी आलेल्या सर्व भाविकांचे स्वागत केले. आज बाहेरगावून आलेल्या हजारो स्वयंसेवकांनी भाविकांना आमटी भाकरी वाढण्याचे काम केले