कोल्हारमध्ये जनसेवा फाउंडेशनतर्फे संक्रांतीनिमित्त हळदीकुंकू समारंभ
डॉ. सुजय दादा विखे पाटील व धनश्री ताई विखे यांचा सहपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक आकर्षणाचे केंद्रबिंदू

कोल्हार । प्रतिनिधी ।
येथे जनसेवा फाउंडेशनच्या वतीने संक्रांतीनिमित्त खास महिलांसाठी भव्य हळदीकुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात महिलांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले डॉ. सुजय दादा विखे पाटील व धनश्री ताई विखे यांचा सहपत्नीक ग्लॅमरस रॅम्प वॉक, ज्याने उपस्थितांना विशेष आनंद दिला.या वेळी विविध सांस्कृतिक कार्यक्रम, महिला सक्षमीकरण विषयक चर्चा तसेच पारंपरिक पोशाखातील रॅम्प वॉकने कार्यक्रमात रंगत आणली. डॉ. विखे पाटील दांपत्याने उपस्थित महिलांना संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा देत महिलांच्या सामाजिक योगदानाचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसेवा फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले आणि महिला सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष स्वरूप प्राप्त झाले.