अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानात मेधा पतंग महोत्सव – २०२५ उत्साहात संपन्न
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानात मेधा पतंग महोत्सव – २०२५ उत्साहात संपन्न
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानात मेधा पतंग महोत्सव – २०२५ उत्साहात संपन्न
संगमनेर । प्रतिनिधी ।
अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूलच्या मैदानावर मेधा पतंग महोत्सव मंगळवार, दिनांक २१ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवामध्ये अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेच्या अमृतवाहिनी निडो इंटरनॅशनल स्कूल, अमृतवाहिनी मॉडेल स्कूल व अमृतवाहिनी इंटरनॅशनल स्कूल या तीनही स्कूल ने सक्रिय सहभाग नोंदविला.
या विलक्षण आणि अविस्मरणीय अशा मेधा पतंग महोत्सवासाठी महाराष्ट्राचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सौ.कांचनताई थोरात, संस्थेच्या विश्वस्त माननीय सौ.शरयु देशमुख, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अनिल शिंदे, पॉलिटेकनिक कॉलेजचे प्राचार्य व्ही.बी.धुमाळ, चि.राजवर्धन थोरात तसेच संस्थेचे विविध मान्यवरांनी उपस्थित राहून मेधा पतंग महोत्सवात सामूहिक रीतीने पतंग उडविण्याचा आनंद घेतला. या महोत्सवाची विशेषता म्हणजे विद्यार्थ्यांनी पतंग उडविण्यासाठी शाळेकडून पुरविण्यात आलेले प्लास्टिक पतंग ऐवजी कागदी पतंग आणि नायलॉन दोऱ्याऐवजी कॉटनचा दोरा वापरला. या उपक्रमातून आकाशातील पक्षांना कोणतीही इजा होऊ देऊ नये व पर्यावरण संरक्षण करणे हा महत्त्वाचा संदेश विद्यार्थ्यांना देण्यात आला. मेधा पतंग महोत्सवाचे औचित्य साधून निडो स्कूलने विद्यार्थ्यांना लोकसंस्कृती,रूढी, परंपरांबरोबरच आकाशातील पक्षांचे संरक्षण करण्याची जाणीव करून दिली.
निडो इंटरनॅशनल स्कूलच्या शाळा संचालिका सौ. अंजली कन्नावार यांचे विलक्षण नेतृत्व आणि अखंड पाठींबा तसेच मॉडेल स्कूलच्या प्राचार्या सौ.शितल गायकवाड, इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ.जसविंदर सेठी यांच्या मार्गदर्शनाखाली मेधा पतंग महोत्सव आनंदी व शिस्तबद्ध वातावरणात पार पडला.