ब्रेकिंग

उपसा यंत्रणेमुळे उच्चस्तरीय कालव्यातून दुष्काळी गावांना पाणी

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार

उपसा यंत्रणेमुळे उच्चस्तरीय कालव्यातून दुष्काळी गावांना पाणी

उपसा यंत्रणेमुळे उच्चस्तरीय कालव्यातून दुष्काळी गावांना पाणी

ना. राधाकृष्ण विखे पाटील यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार

लोणी । प्रतिनिधी । जलसंपदा मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांच्या पुढाकाराने निळवंडे धरणातील नविन उपसा यंत्रणा प्रथमच कार्यान्वित झाल्याने धरणातील पाणीपातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली असतानाही उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाण्याचा प्रवाह यशस्वीपणे सुरू झाला. कडक उन्हाळ्यात उपसा यंत्रणेमुळे निळवंडेचे पाणी पोहोचल्याचा मोठा दिलासा ग्रमास्थांना मिळाला असून, विहिरींच्या पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे.


संगमनेर येथे जलसंपदा विभागाची बैठक मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.लाभक्षेत्रातील शेतकर्यांच्या समस्या जाणून घेत मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना काही महत्वपूर्ण सूचना करून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्यास सांगितले होते. आमदार डॉ किरण लहामटे, आमदार अमोल खताळ पाटील, माजी आमदार वैभवराव पिचड, जिल्हा परिषद अर्थ व बांधकाम समिती चे माजी सभापती कैलासराव वाकचौरे यांच्यासह विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीस उपस्थित होते. यावेळी अनेक शेतकऱ्यांनी
उपस्थित केलेल्या प्रश्नावर मंत्री विखे पाटील यांनी सकारात्मक निर्णय घेवून उच्चस्तरीयचे पाणी कळस गावाला मिळण्याच्या दुष्टीने कार्यवाही केल्याने आज आवर्तनाचे पाणी पोहचल्याचे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले आहे.

उच्च स्तरीय कालवे झाल्या पासून कळस आणि पंचक्रोशीतील गावांना पाणी आले नव्हते. मात्र संगमनेर येथील बैठकीत मुद्दा उपस्थित झाला.याबाबत जलसंपदा मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिलेल्या आदेशची अंमलबजावणी झाली. माजी खासदार सुजय दादा विखे पाटील यांनी विशेष सहकार्य केले आहे. कैलासराव वाकचौरे यांनी प्रयत्न केले आहे.

 भाऊसाहेब वाकचौरे पाटील माजी सरपंच, कळस

माजी मंत्री जलनायक मधुकरराव पिचड यांचे संकल्पनेतून फक्त अकोले तालुक्यासाठी असणाऱ्या निळवंडे धरणाच्या उच्चस्तरीय पाईप कालव्यांचा लाभ तालुक्यातील २ हजार ३२८ हेक्टर क्षेत्रास होतो. डाव्या उच्चस्तरीय कालव्याची लांबी २०.६८ किमी, त्याचे लाभक्षेत्र ८७१ हेक्टर तर उजव्या उच्चस्तरीय कालव्याची लांबी १९.३७ किमी व लाभक्षेत्र १ हजार ४५७ हेक्टर आहे.
उच्चस्तरीय पाईप कालवे तलांक ६२७.४० मीटरवरून सुरू होतात. निळवंडे जलाशयाची पूर्ण संचय पातळी तलांक ६४८.१५ मी. आहे. उच्च स्तरीय पाईप कालवा हा तलांक ६३० मी ते ६४८ मी. या गुरुत्वीय दबावाने संकल्पित करण्यात आलेला आहे. म्हणजेच धरणातील पाणीपातळी जेव्हा तलांक ६३० मी. ते ६४८.१५ मी. दरम्यान असते तेव्हाच या उच्चस्तरीय पाईप कालव्यातून पाणी देता येते. पाणीपातळी तलांक ६३० मी. पेक्षा कमी झाली की धरणात पाणी असूनही या कालव्याद्वारे पाणी देता येत नव्हते. मात्र शेतकऱ्यांची समस्या दूर करण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना सूचना देवून विशेष यंत्रणा कार्यान्वित करण्यास सांगितले होते.त्यानूसार अधिकार्यांनी उच्चस्तरीय कालवे प्रणाली करिता उपसा यंत्रणेची उभारणी करून त्याची यशस्विता सिध्द करून दाखवली आहे.

जाहिरात

जलाशयात तलांक ६१४ मी. येथून १९५ अश्वशक्तीच्या दोन पंपांद्वारे हा पाणी उपसा ५५० मिमी आकाराच्या पाईपद्वारे वितरण कुंडात जमा होते. या ठिकाणी पाणी पातळी तलांक ६४२ मी. ठेवली जाते. यामुळे उच्चस्तरीय कालव्यातून बाराही महिने पाणी पुरवठा करता येणार असल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

जाहिरात

उन्हाळ्यात पाणी पाहायला मिळाल्याचे मोठे समाधान शेतकऱ्यांनी व्यक्त केले असून,. हे पाणी ओढे, नाले, बंधारे यात सोडले जाणार असल्याने पाण्याची भूगर्भातील पाणी पातळी वाढेल त्याचा लाभ त्या परिसरातील शेतकऱ्यांना होईल.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!