कोपरगाव तालुक्यातील ७५ गावच्या सरपंच पदासाठी उद्या आरक्षण सोडत – नायब तहसिलदार सातपुते

कोपरगाव तालुक्यातील ७५ गावच्या सरपंच पदासाठी उद्या आरक्षण सोडत – नायब तहसिलदार सातपुते
कोपरगाव तालुक्यातील ७५ गावच्या सरपंच पदासाठी उद्या आरक्षण सोडत – नायब तहसिलदार सातपुते
कोपरगाव । विनोद जवरे ।
सन २०२५ ते २०३० या कालावधीत मदत संपणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत उद्या बुधवार दि २३ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता कोपरगावचे तहसीलदार महेश सावंत यांच्या अध्यक्षतेखाली कोपरगाव तहसील कार्यालयात होणार असल्याची माहिती कोपरगावच्या निवासी नायब तहसिलदार प्रफुल्लित्ता सातपुते यांनी दिली आहे.

सविस्तर वृत्त असे की, ग्रामविकास विभाग, मंत्रालय मुबई यांचे दिनाक ५ मार्च २०२५ रोजीच्या राजपत्रातील अनुसुची २ मध्ये अहिल्यानगर जिल्हयातील अनुसचित क्षेत्रातील ग्रामपंचायती वगळून इतर सर्व ग्रामपंचायतीकरीता अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकाचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण सरपंच पदाचे वाटप करण्यात आलेले आहे त्यानुसार तालुक्यातील अनुसुचित जातीः जनुसुचित जमाती व नागरीकांचा मागास प्रवर्गाकरीला सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करण्याची कार्यवाही संबंधित तहसिलदार यानी करणेबाबत मा. जिल्हाधिकारी अहिल्यानगर यांचेकडील सदर्भीय पत्रान्वये व आदेशान्वये कोपरगाव तालुक्यातील ७५ ग्रामपंचायती करीता प्रवर्ग निहाय सरपंच पदाचे आरक्षण निश्चित करून देण्यात आलेले आहे.यात बिगर अनु क्षेत्रातील ग्रामपंचायतीची संख्या ७५ असून अनुसूचित जाती आरक्षित सरपंचाची एकूण पदे १० त्या पैकी महिलासाठी ५ पदे, अनुसूचित जमाती आरक्षित सरपंचाची एकूण १६ पदे त्या पैकी महिलासाठी ८ पदे, नागरिकांचा मागास प्रवर्ग साठी आरक्षित सरपंचाची २० पदे त्यापैकी महिलासाठी १० पदे, खुला प्रवर्ग साठी सरपंचाची एकूण २९ पदे तर त्यापैकी महिलासाठी १५ पदे असे कोपरगाव तालुक्यातील एकूण ७५ गावच्या सरपंच पदाकरिता अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागासप्रवर्ग तसेच सर्वसाधारण प्रवर्गातील सरपंच पदाची आरक्षण सोडत उद्या बुधवार दिनांक २३ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय कोपरगाव येथील सभागृहात होणार आहे तरी संबंधितांनी उपस्थित राहावे असे आवाहन नायब तहसीलदार प्रफुल्लिता सातपुते यांनी केले आहे.

तसेच तहसिलदार कोपरगाव यांनी लालुक्यातील अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती व नागरीकाचा मागास प्रवर्ग व सर्वसाधारण प्रवर्गाकरीता सरपंच पदाचे आरक्षण निश्चित केल्यानंतर उपविभागीय अधिकारी शिडी भाग शिर्डी यांना एक दवितीयांश सरपंच पदे महिला (अनुसुचित जाती महिला व अनुसुचित जमाती महिला, नागरीकांचा मागास प्रवर्ग महिला व सर्वसाधारण महिला) यांच्यासाठी सोडत पध्दतीने आरक्षण निश्चित करण्यासाठी स्वतंत्र पणे प्राधिकृत करण्यात आले असून सदर महिला आरक्षणाची सोडत सभा गुरुवार दिनाक २४ एप्रिल रोजी दुपारी १२ वा. तहसिल कार्यालय कोपरगाव येथील सभागृहात आयोजीत करण्यात आली आहे.