ब्रेकिंग
क्रीडा क्षेत्रात मुलींची कामगिरी कौतुकास्पद- डॉ जयश्रीताई थोरात
शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेती प्रणिता सोमनचा सन्मान
क्रीडा क्षेत्रात मुलींची कामगिरी कौतुकास्पद- डॉ जयश्रीताई थोरात

संगमनेर । विनोद जवरे ।
संगमनेरची सुकन्या प्रणिता सोमन हिने सायकल या वेगळ्या क्रीडा प्रकारात आपले करिअर करताना राज्य पातळीवरील 2019- 20 चा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्राप्त केला आहे .हे संगमनेर करता अभिमानास्पद असून क्रीडा क्षेत्रात संगमनेर तालुक्यातील मुलींनी केलेली कामगिरीही कौतुकास्पद ठरत असल्याचे गौरवोदगार एकविरा फाउंडेशनच्या अध्यक्ष कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात यांनी काढले आहे.

यशोधन जनसंपर्क कार्यालय येथे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार मिळाल्याबद्दल प्रणिता सोमन हिचा व विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे झालेल्या राज्यस्तरीय वुशू स्पर्धेत मोक्षदा मिलिंद आवटी हिला कांस्यपद मिळाल्याबद्दल सत्कार करण्यात आला याप्रसंगी प्रणिताचे वडील डॉ प्रफुल्ल सोमण, साहित्यिक अनिल सोमणी, मिलिंद औटी ,नामदेव कहांडळ, कृष्णा आवटी ,संदीप लोहे आदी उपस्थित होते.

प्रणिता सोमन हिने सायकलींग या क्रीडा प्रकारात संगमनेर सह महाराष्ट्राला अनेक विविध पदे मिळवून दिले आहेत. विद्यार्थी दशेत सायकलिंग बरोबर तिने बुद्धिबळ, नेटबॉल, ट्रॅक ऑफ वार या खेळातही राज्यस्तरीय स्पर्धेपर्यंत मजल मारली आहे. खडकाळ व अवघड वाटेवर सायकलिंग करत आपले करिअर करणाऱ्या प्रणिती सोमन हिने मुलींसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे. तिला नुकताच राज्य शासनाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार जाहीर झाला असून काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वतीने तिचा यशोधन कार्यालयात सत्कार करण्यात आला.. याचबरोबर विभागीय क्रीडा संकुल अमरावती येथे झालेल्या 21 व्या राज्यस्तरीय वुशु अजिंक्य स्पर्धेत संगमनेरच्या मोक्षदा मिलिंद आवटी हिने कास्यपदक आहे.याप्रसंगी बोलताना डॉ जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका हा विकसित व वैभवशाली तालुका म्हणून राज्यात ओळखला जातो संगमनेर तालुका हा एक परिवार असून या परिवारातील अनेक युवक व युवतीने वेगवेगळ्या क्षेत्रात आपले मोठे स्थान निर्माण केले आहे क्रीडा क्षेत्रात अजिंक्य रहाणे हा आंतरराष्ट्रीय पातळीवर कामगिरी बजावत आहे तर मुलींच्या क्रिकेट स्पर्धेतही पूनम खेमनर ,माया सोनवणे, सुहानी कहांडळ ह्या चांगली कामगिरी करत आहेत प्रणिता सोमन ने बालपणापासूनच सायकलिंग सारख्या अवघड क्षेत्रात आपले करिअर निर्माण करताना इतरांमध्ये याविषयी आवड निर्माण केली आहे आज प्रणिता ही संगमनेर करांचा अभिमान ठरली आहे अत्यंत चांगल्या शैक्षणिक सुविधांबरोबर क्रीडा सुविधा ही संगमनेर मध्ये मोठ्या प्रमाणे उपलब्ध असून संगमनेरच्या विविध युवक युवतीने आंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव उज्वल करावे असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी प्रणिता सोमन म्हणाली की मला कायम आमदार बाळासाहेब थोरात व माजी आमदार डॉ सुधीर तांबे यांच्याकडून प्रेरणा मिळाली आहे. यापुढेही आणखी चांगले काम करताना देशपातळीवर मी संगमनेरचा लौकिक वाढविली असेही ती म्हणाली.प्रणिता सोमन व मोक्षदा आवटी यांच्या यशाबद्दल काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, इंद्रजीत भाऊ थोरात ,नगराध्यक्ष सौ दुर्गाताई तांबे, रणजीतसिंह देशमुख, बाबासाहेब ओहोळ, कॅन्सरतज्ञ डॉ जयश्रीताई थोरात, आदींसह विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.