ब्रेकिंग
राजेशजी परजणे यांच्या वाढदिवसानिमित्त बहादरपुर, जवळके परिसरातील सर्वच जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना उद्या साहित्य वाटप

कोपरगांव । प्रतिनिधी । महानंदा दूध संघाचे माजी अध्यक्ष, अहिल्यानगर जिल्हा परिषदेचे माजी सदस्य तथा गोदावरी खोरे नामदेवरावजी परजणे पाटील दूध उत्पादक संघ सहजानंदनगरचे चेअरमन राजेशआबा नामदेवराव परजणे पाटील यांच्या शनिवार दि २२ नोव्हेंबर २०२५ रोजी ५६ व्या वाढदिवसानिमित्त कोपरगाव तालुक्यातील अंजनापूर परिसरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना उद्या आरोग्य दूध बाळासाहेब यशवंत गव्हाणे व मित्रपरिवार यांच्या वतीने शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे.

या प्रसंगी मनेगाव, काकडी,खालकर मळा, गोर्डे वस्ती,डांगेवाडी,अंजनापूर, म्हसोबा वस्ती, देशमुख मळा, रांजणगाव, बहादरपूर, मल्हारवाडी,गव्हाणे वस्ती, गुंजाळ वस्ती,जवळके,बहादरबाद आदी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना साहित्य वाटप करण्यात येणार आहे.