ब्रेकिंग

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला एक्सलंट एज्युकेशन ब्रँड पुरस्कार

अमृतवाहिनी शिक्षण संस्थेला एक्सलंट एज्युकेशन ब्रँड पुरस्कार

संगमनेर (प्रतिनिधी) – काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखालील अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेला उत्कृष्ट गुणवत्तापूर्ण उच्चशिक्षणाबद्दल प्रतिष्ठेचा एक्सलंट एज्युकेशन ब्रँड हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे.नाशिक येथे हिंदी चित्रपट अभिनेते दिनो मारिया व नाशिकचे पोलीस कमिशनर संदीप कर्णिक यांच्या हस्ते हा पुरस्कार संस्थेच्या विश्वस्त सौ. शरयूताई देशमुख व मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे यांनी स्वीकारला .याप्रसंगी इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉ.एम ए व्यंकटेश, अकॅडमी डायरेक्टर डॉ जे बी गुरव, डॉ. बी एम लोंढे ,श्रीमती शितल गायकवाड ,उपप्राचार्य प्रा.जी.बी. काळे, स्नेहल शेकदार, दूध संघाचे कार्यकारी संचालक डॉ. सुजित खिलारी आदींसह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगचे शिक्षण मिळावे याकरता 1978 मध्ये अमृतवाहिनी संस्थेची स्थापना केली. या संस्थेमार्फत इंजिनिअरिंग कॉलेज ,पॉलीटेक्निक ,एमबीए, बी फार्मसी, डी फार्मसी ,मॉडेल स्कूल, आयटीआय, इंटरनॅशनल स्कूल, सीबीएससी पॅटर्न, कृषी महाविद्यालय, या केजी टू पीजी विविध विद्यालयांमधून सुमारे दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. उत्कृष्ट निकाल, गुणवत्ता पूर्ण शिक्षण, स्वच्छ व सुंदर हिरवाईने नटलेल्या परिसर आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबवण्यात येणारे विविध उपक्रम याकरता टाइम्स समूहातर्फे संगमनेर येथील नामांकित अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्थेला एक्सलेंट एज्युकेशन ब्रँड या मानाच्या पुरस्काराने गौरवले आहे.यावेळी सिनेअभिनेता डीनो मारिया म्हणाले की, मेट्रो शहरानंतर ग्रामीण भागातून येणाऱ्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेचे नाव हे मोठ्या शहरांमध्ये झाले आहे. किंबहुना अमृतवाहिनी हा गुणवत्तेचा ब्रँड बनला आहे. या संस्थेला पुरस्कार देताना विविध मानांकनांमधून केलेली निवड महत्त्वपूर्ण ठरणारी आहे. अमृतवाहिनी संस्थेतील मेधा संस्कृतिक महोत्सव हा महाराष्ट्रातील मोठा उपक्रम ठरला आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी या माध्यमातून संस्थेने केलेले प्रयत्न हे अत्यंत चांगले असून माझे समकालीन अनेक अभिनेते व अभिनेत्री यांनी या मेधा महोत्सवात सहभाग नोंदवला असल्याचे ते म्हणाले तर पोलीस कमिशनर संदीप कर्णिक म्हणाले की, इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांना करिअरच्या दृष्टीने गुणवत्ता पूर्ण शिक्षण देण्याचे काम अमृतवाहिनीने केले असून अनेक विद्यार्थी हे एमपीएससी व यूपीएससी परीक्षेच्या माध्यमातून शासकीय विभागांमधून सेवा देत आहे आणि हे अमृतवाहिनीचे वेगळे वैशिष्ट्य ठरले आहे.हा पुरस्कार मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष तथा मा. शिक्षण मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात ,मा. आमदार डॉ.सुधीर तांबे, संस्थेच्या विश्वस्त सौ शरयूताई देशमुख, बाळासाहेब पाटील गुंजाळ, डॉ. जयश्रीताई थोरात,मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, व्यवस्थापक प्रा. विवेक धुमाळ यांनी अभिनंदन केले आहे.

गुणवत्ता ही अमृतवाहिनीचे वैशिष्ट्य- सौ. देशमुख

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना परिपूर्ण व गुणवत्ता शिक्षण देण्याबरोबर विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कंपन्यांशी संस्थेचा असलेला समन्वय यामुळे अनेक विद्यार्थ्यांना मोठ्या पॅकेजवर थेट नोकऱ्या मिळत आहेत. उत्कृष्ट निकाल, शिस्त, मेधा महोत्सव आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास याबरोबर पुढील काळात अधिकाधिक विद्यार्थ्यांच्या नोकरीसाठी संस्थेकडून सातत्याने प्रयत्न होणार असून या कामाला या पुरस्काराने अधिक बळकटी मिळाली असल्याचे विश्वस्त सौ.शरयू ताई देशमुख यांनी म्हटले आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!