ब्रेकिंग

निळवंडेचे भगीरथ आ. थोरात यांनी गंगा आणली दारी

गावोगावी कालव्यांमधील पाण्याचे उत्साहात पूजन

निळवंडेचे भगीरथ आ. थोरात यांनी गंगा आणली दारी

संगमनेर । विनोद जवरे ।

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा निळवंडे धरण व कालव्याचे जनक महाराष्ट्राचे जलनायक आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून पूर्ण झालेले कालव्यांमधून अखेर निळवंडे चे पाणी संगमनेर तालुक्यात आले आहे. गावोगावी या पाण्याचे मोठे उत्साहात जलपूजन होत असून निळवंडेचे भगीरथ असलेल्या आमदार बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळग्रस्तांच्या दारी गंगा आल्याची भावना सर्व जनतेमधून व्यक्त होत आहे.

वेल्हाळे, घुलेवाडी येथे मा.महसूल व शिक्षणमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते कालव्यांचे जलपूजन करण्यात आले यावेळी समवेत सौ दुर्गाताई तांबे, सौ सुनंदाताई जोरवेकर, सिताराम राऊत, नवनाथ आरगडे, भास्करराव पानसरे , अनिल राऊत ,दत्तू राऊत, सरपंच सौ निर्मलाताई राऊत, बाळासाहेब पानसरे, ऋतिक राऊत, गोरक्षनाथ सोनवणे, सोमनाथ सोनवणे , सरपंच विष्णू आव्हाड सिताराम गुळवे तानाजी शिरतात वैभव आरोटे निळवंडे पाट पाणी समितीचे नानासाहेब शेळके उत्तमराव घोरपडे यांसह शेकडो कार्यकर्ते व महिला उपस्थित होत्या.

यावेळी सर्व ठिकाणी वाजत गाजत आमदार बाळासाहेब थोरात यांची मिरवणूक काढण्यात आली. तर पारंपारिक वाद्यसह ढोल ताशांचा गजर करत  पाण्याचे पूजन करण्यात आले. यावेळी सर्व आबाल वृद्धांचा उत्साह मोठा होता.अनेक दिवसांच्या प्रतीक्षेनंतर निळवंडे चे पाणी संगमनेर तालुक्यात आले असून ही तालुक्याची स्वप्नपूर्ती व ऐतिहासिक आनंदाचा क्षण ठरला आहे. या धरणाच्या व कालव्यांच्या कामासाठी लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांचेच मोठे योगदान असून त्यांच्या प्रयत्नातून अखेर दुष्काळग्रस्तांची स्वप्नपूर्ती होत आहे.आमदार थोरात हे पाण्याचे आमदार म्हणून ओळखले जात असून निळवंडे धरण व कालवे हे जीवनाचे ध्यासपर्व मानून त्यांनी पूर्ण केले.

 अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रत्यक्ष पाणी पाहिल्याने लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात हेच खरे निळवंडेचे भगीरथ असून त्यांनी निळवंडेच्या पाण्याची गंगा कालव्यांद्वारे आपल्या दारी आणली असल्याची भावना जवळेकडलग, घुलेवाडी, वेल्हाळे, सुकेवाडी, पोखरी, वडगाव लांडगा या गावांमधील शेतकरी नागरिक युवक व महिला यांनी व्यक्त केली आहे

बुधवारी निळवंडे करूले येथे जलपूजन

तळेगाव गट हा दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जात असून यागटांमध्ये लोकनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून निळवंडेचे पाणी उद्या दाखल होत आहे. याबद्दल तळेगाव गटातील सर्व गावांच्या वतीने बुधवार 7 जून 2023 रोजी सायंकाळी 5 वा निळवंडे  शिवारामध्ये पाण्याचे पूजन करण्यात येणार आहे

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!