अमृतवाहिनी आयटीआय चा उत्कृष्ट निकाल

संगमनेर । विनोद जवरे ।
गुणवत्ता व उच्च दर्जाच्या प्रशिक्षणाबरोबर विद्यार्थ्यांसाठी प्लेसमेंट ची खास सुविधा असलेल्या अमृतवाहिनी आयटीआय ने दरवर्षीप्रमाणे आपल्या उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवताना यावर्षीही द्वितीय वर्षाचा निकाल 80 % लागला असल्याची माहिती प्राचार्य एस.टी .देशमुख यांनी दिली आहे. याबाबत अधिक माहिती देताना देशमुख म्हणाले की, काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉ सुधीर तांबे आणि विश्वस्त सौ. शरयू ताई देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी आयटीआय ने आयएसओ चा दर्जा मिळाला असून विविध कंपन्यांशी असलेल्या समन्वयामुळे विद्यार्थ्यांना नोकरीच्या चांगल्या संधी मिळत आहे .यावर्षी जुलै 2023 मध्ये झालेल्या अखिल भारतीय व्यवसाय वार्षिक परीक्षेत संस्थेचा ८० टक्के निकाल लागला आहे .यामध्ये फिटर ट्रेड मधून माळी सोहन बाळू हा ८८.१७ % गुण मिळवून आयटीआय मध्ये प्रथम आला आहे. तर मोटर मेकॅनिकल व्हेईकल ट्रेडमध्ये नालकर वैभव बाळासाहेब ८८ टक्के गुण मिळून द्वितीय आला आहे.इलेक्ट्रिशियन ट्रेड मधील आहेर अभिषेक ज्ञानेश्वर हा 83% गुण मिळून तृतीय आला आहे. तर वायरमन मधील वाळे राहुल अशोक हा 80.50% गुण मिळून चतुर्थ आला आहे. या सर्व विद्यार्थ्यांचे मा महसूल व शिक्षण मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ सुधीर तांबे ,विश्वस्त सौ शरयू ताई देशमुख ,इंद्रजीत भाऊ थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे ,व्यवस्थापक प्रा विवेक धुमाळ, डॉ .जे बी गुरव, प्राचार्य एस.टी. देशमुख यांनी अभिनंदन केले आहे .या सर्व विद्यार्थ्यांना संजय कुटे,बाळासाहेब आहेर, संदीप दिघे ,शरद खेमनर, अविनाश डेंगळे, सचिन मोरे, संपत हिरे ,राहुल वर्पे या शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले आहे.