ब्रेकिंग
कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार अँक्शन मोडवर
पदभार स्वीकारताच कारवाईचा दणका सुरू


कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार अँक्शन मोडवर

कोपरगांव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार अँक्शन मोडवर
पदभार स्वीकारताच कारवाईचा दणका सुरू
कोपरगांव । प्रतिनिधी । गुरुवार दि १२ जून रोजी कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक पदाचा पदभार रामकृष्ण कुंभार यांनी स्वीकारताच दुपारी २:४५ वाजण्याच्या सुमारास शहरातील गांधीनगर भागात भिंतीच्या आडोशाला ६२ वर्षीय लक्ष्मण मोतीलाल कुकर हे विनापरवाना बेकायदा लोकांकडून पैसे घेऊन त्यांना कल्याण मटका आकड्याचा चिठ्ठ्या लिहून देऊन कल्याण मटका नावाचा हार जीतीचा जुगार खेळताना व खेळताना मिळवून आला असता पोलीस कॉन्स्टेबल गणेश काकडे यांच्या फिर्यादीनुसार कोपरगाव शहर पोलीस स्टेशनमध्ये लक्ष्मण कुकर यांच्या विरुद्ध २९३/२०२५ जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२ (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्याकडून १०५० रुपयाची रोकड, २ रुपयाचे चिठ्ठ्या, १० रुपयांच्या कार्बन व पेन असा १०६२ रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल दिपक रोकडे हे करत आहे.

तर दुसऱ्या घटनेत १३ जून रोजी सकाळी ७ वाजून २० मिनिटांच्या सुमारास शहर पोलीस स्टेशन हद्दीतील टाकळी येथे ३० वर्षीय अनिल राजू कांबळे हा त्याच्या टाकळी येथील राहत्या घरी विनापरवाना बेकायदेशीर स्वतःच्या फायद्या करता ३५ लिटरच्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रम मध्ये अंदाजे ३० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू आंबट उग्र वास येत असलेली १०० रुपये लिटर प्रमाणे ३ हजार रुपयाची गावठी हातभट्टीची दारू स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विनापरवाना बेकायदा ताब्यात बाळगून तिची चोरटी विक्री करताना मिळून आला असता अनिल कांबळे यांच्या विरुद्ध शहर पोलीस स्टेशनमध्ये पोलीस कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर भांगरे यांच्या फिर्यादीनुसार २९६/२०२५ प्रॉव्हिशन ६५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहर पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बी.एच तमनर हे करत आहे.