एकविराच्या वतीने भव्य महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा
जागतिक महिला दिनानिमित्त 6 मार्च ते 10 मार्च महिला क्रिकेट स्पर्धा
एकविराच्या वतीने भव्य महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा

एकविराच्या वतीने भव्य महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा
जागतिक महिला दिनानिमित्त 6 मार्च ते 10 मार्च महिला क्रिकेट स्पर्धा

यावर्षीही 6 मार्च ते 10 मार्च 2025 या कालावधीमध्ये सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलात ही स्पर्धा होणार आहे. यामध्ये महिला टेनिस बॉल क्रिकेट व रस्सीखेच स्पर्धा होणार आहेत. शालेय गट, महाविद्यालयीन गट व खुला महिला गट असे स्वरूप असून तीनही गटातील विजेत्यांना प्रथम पारितोषिक 11000 रुपये, द्वितीय पारितोषिक 7000 रुपये व तृतीय पारितोषिक 5000 रुपये देण्यात येणार आहेत. आंतरराष्ट्रीय सामन्यांसारखे हिरवळीवर हे सामने खेळवले जाणार असून सर्वांना सनकोट व कॅप दिली जाणार आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन 6 मार्च 2025 रोजी सकाळी दहा वाजता लोकनेते बाळासाहेब थोरात मा आ. डॉ. सुधीर तांबे, सौ.दुर्गाताई तांबे, आयोजक डॉ.जयश्रीताई थोरात यांच्या उपस्थितीमध्ये होणार आहे.सर्व सामन्यांसाठी प्रवेश विनामूल्य असून या स्पर्धांमधून जास्तीत जास्त संघांनी आपला सहभाग नोंदवावा . प्रवेश व संपर्कासाठी महिला व युवतींनी 7057037037, या क्रमांकावर अथवा यशोधन कार्यालय येथे संपर्क साधावा. असे आवाहन एकविरा फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
महिलांसाठी भव्य मोफत आरोग्य तपासणी शिबिर9 व 10 मार्च 2925 रोजी एसएमबीटी सेवाभावी ट्रस्टच्या वतीने क्रीडा संकुल येथे, तालुक्यातून येणाऱ्या सर्व महिला भगिनी, सर्व खेळाडू व उपस्थित महिला भगिनींकरता सर्व प्रकारची आरोग्य तपासणी मोफत करण्यात येणार आहे. या महिला आरोग्य तपासणीच्या सर्व महिलांनी लाभ घ्यावा असे आवाहन कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केले आहे.