ब्रेकिंग

औषधनिर्मिती संशोधनात भारतीय विद्यार्थ्यांना मोठी संधी- डॉ. व्ही. कलाईसेल्वन 

अमृतवाहिनी डी  फार्मसीत इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी 700 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग

जाहिरात
औषधनिर्मिती संशोधनात भारतीय विद्यार्थ्यांना मोठी संधी- डॉ. व्ही. कलाईसेल्वन 
औषधनिर्मिती संशोधनात भारतीय विद्यार्थ्यांना मोठी संधी- डॉ. व्ही. कलाईसेल्वन 
अमृतवाहिनी डी  फार्मसीत इंटरनॅशनल कॉन्फरन्ससाठी 700 हुन अधिक विद्यार्थ्यांचा सहभाग
संगमनेर । प्रतिनिधी । जगभरातील लोकसंख्येच्या तुलनेत भारतामध्ये मोठी लोकसंख्या आहे. वाढत्या विविध आजारांवर प्रभावी औषधांची गरज असून अमृतवाहिनीत होत असलेल्या इंटरनॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून औषध संशोधनास विद्यार्थ्यांना मोठा वाव मिळणार असल्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय भारत सरकारमधील वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ व्ही कलाई सेलवण यांनी म्हटले असून या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्स मध्ये भारतातील विविध राज्यांसह जगभरातील 700 हुन अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला आहे.

अमृतवाहिनी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी मध्ये दोन दिवसीय ड्रग्स डिस्कवरी अँड डेव्हलपमेंट फ्रॉम कॉन्सेप्ट टू कमर्शियललायझेशन या विषयावर इंटरनॅशनल कॉन्फरन्स होत आहे या कॉन्फरन्सचे उद्घाटन संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त सौ शरयूताई देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी इंडियन फार्माकोपिया कमिशन, व केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे वरिष्ठ प्रमुख वैज्ञानिक अधिकारी डॉ.कलाई सेल्वन , आयसीएमआर नवी दिल्लीचे डॉ विकास दिघे, न्यू जर्सी अमेरिका येथील डॉक्टर मनोज जाधव, डॉ आभा चाळपे – घोष, इंडोनेशिया येथील डॉक्टर मास्टरीया इनोविल्सा, थायलंड येथील इक्कासित कुमारनसीत, मलेशिया येथील डॉ. झूरीना बिनती हसन, डॉ नितीन माळी, डॉ सचिन जोशी, इशिता श्रीवास्तव, विश्वस्त ॲड .आर.बी. सोनवणे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, डॉ. जे बी गुरव, प्रा. व्ही बी धुमाळ, प्राचार्य डॉ मनोज शिरभाते आदींसह सर्व विभागांचे प्राचार्य उपस्थित होते.

यावेळी उद्घाटनपर मार्गदर्शन करताना भारत सरकारचे डॉ व्ही.  कलाई सेल्वन  म्हणाले की, महाराष्ट्राचे माजी शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली अहिल्यानगर जिल्ह्यातील  संगमनेर तालुक्यात औषधनिर्मिती शिक्षणाची मोठी व्यवस्था आहे. भारत हा लोकसंख्येने मोठा असल्याने आजारांचे प्रमाणही जास्त आहे. औषध निर्मितीमध्ये जास्तीत जास्त संशोधन होणे गरजेचे आहे त्यामुळे सजीवांना जास्त व निरोगी आयुष्य मिळणार आहे. अमृतवाहिनी संस्थेच्या माध्यमातून संशोधना करता होणारे काम हे कौतुकास्पद असून विद्यार्थ्यांना ही मोठी संधी आहे. इंटरनॅशनल कॉन्फरन्स मुळे जगभरातील अनेक शास्त्रज्ञ या ठिकाणी आहेत दोन दिवसांमध्ये नवनवीन विषयावर संशोधन होणार असून विविध साथींचे आजार वाढलेले रोगांचे प्रमाण यावर प्रभावी औषध निर्मिती व संशोधन यावर होणारे मार्गदर्शन विद्यार्थ्यांच्या करिअरला दिशादर्शक ठरणार आहे.

तर डॉ विकास दिघे म्हणाले की, जगाला घाबरून टाकणाऱ्या कोरोनाची लस ही भारतीय आयसीएमआर मध्ये तयार झाली. अनेक आजारांवर औषध निर्मितीमध्ये जास्तीत जास्त काम होणे गरजेचे आहे. विद्यार्थ्यांमध्ये नवीन शास्त्रज्ञ असून यापुढील काळामध्ये आयसीएमआर संस्थेच्या माध्यमातून या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी अधिक प्रयत्न केले जातील.यावेळी डॉ.मनोज जाधव, डॉ. जे बी गुरव यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतातील व भारताबाहेरील विविध विद्यापीठांमधील  700 हुन अधिक विद्यार्थी, प्राध्यापक व संस्थेतील इतर विभागांचे प्राचार्य उपस्थित होते या कार्यक्रमाचे प्रास्तावित,स्वागत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ मनोज शिरभाते यांनी केले यावेळी महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इंटरनॅशनल कॉन्फरन्समधून संशोधनास प्रोत्साहन- सौ.शरयूताई देशमुख

सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी 1978 मध्ये स्थापन केलेल्या अमृतवाहिनी संस्थेने गुणवत्तेमुळे राष्ट्रीय पातळीवर आपला ठसा उमटवला आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबर संशोधनासाठी सातत्याने विविध उपक्रम राबवले जात आहेत.डी फार्मसी मध्ये होत असलेल्या दोन दिवशीय इंटरनॅशनल कॉन्फरन्स मध्ये 700 हुन अधिक जगभरातील विद्यार्थी व शास्त्रज्ञांबरोबर स्थानिक विद्यार्थ्यांचाही संवाद होणार आहे.  याचबरोबर या कार्यशाळेतून औषधनिर्मिती संशोधनासाठी मोठे प्रोत्साहन मिळणार असून वाढत्या विविध आजारांवर नवीन प्रभावी औषधनिर्मिती ही सजीव सृष्टीची मोठी गरज बनली आहे .त्यासाठी या कार्यशाळेतून नक्कीच काम होईल असा विश्वास  सौ शरयूताई देशमुख यांनी व्यक्त केला आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!