शहापूर येथे आज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता
शहापूर येथे आज अखंड हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता
कोपरगाव । विनोद जवरे ।
कोपरगाव तालुक्यातील शहापूर येथे सालाबाद प्रमाणे याही वर्षी भगवंताच्या कृपेने साधुसंतांच्या आशीर्वादाने श्री क्षेत्र शहापूर येथे वै.ह.भ.प. जाधव गुरुजी व वै.ह.भ.प. ज्ञानेश्वर माऊली गायकवाड यांच्या कृपा आशीर्वादाने तसेच ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज शिंदे व ज्ञानेश्वर दासजी महाराज यांच्या मार्गदर्शनाने शहापूर येथे अखंड हरिनाम सप्ताह तसेच ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत अशी माहिती आयोजकांनी दिली आहे. विठू नामाच्या जयघोषाने सुरू होणाऱ्या सप्ताहात वैराग्यमूर्ती ह.भ.प.बबन महाराज गाडेकर,ह.भ.प.बाळासाहेब महाराज रंजाळे,ह.भ.प.माऊली महाराज चाळक व कृष्णा महाराज चाळक,ह.भ.प.तुकाराम महाराज मुळीक,ह.भ.प. उल्हास महाराज सुर्यवंशी ,ह.भ.प.ज्ञानेश्वर दासजी महाराज, ह.भ.प. गुरुवर्य ज्ञानेश्वर महाराज शिंदे,ह.भ.प.एकनाथ महाराज शास्त्री अशा नामवंत कीर्तनकारांचे कीर्तन होणार आहेत. याबरोबरच सोमवार दि.24/4/2023 तारखेला सकाळी 11 ते 1 प.पु. गुरुवर्य संत श्री.महंत ह.भ.प. रामगिरीजी महाराज ( सरला बेट ) यांचे काल्याचे कीर्तन होईल.