ब्रेकिंग

हिंगलाजनगर येथे संगीतमय मीराकथेची सांगता आनंदमय वातावरणात संपन्न

हिंगलाजनगर येथे संगीतमय मीराकथेची सांगता आनंदमय वातावरणात संपन्न

खेडे । गायत्री शिरसाट ।

दिनांक 2 तारखेपासून हिंगलाजनगर येथे अगदी संगीतमय वातावरणात प्रेममुर्ती संतमिराबाईंच चरिञ हे वैष्णवभूषण सुजित महाराज देवरगावकर यांच्या मधूर वाणीतुन कथन चालू होतं. तर यांच प्रसंगी नागरीकांनी अन् पंचक्रोशीतील भाविकभक्तांनी उत्सफूर्त प्रतिसाद दिला.

या प्रसंगी अनेक क्रार्यक्रमासाठी अनेक चित्र दर्शन करण्यातं आलं तर तिसर्या दिवशी संथ मिराबाईंचा भगवान श्री कृष्णा सोबतं विवाह लावण्यात आला .तर या प्रसंगी प्रांजल दिपक कोल्हे ही वधू करण्यात आली होती . तर तीचा विवाह अगदी रितीरिवाजा प्रमाणे लावण्यात आला.आणि दैदिप्यमान सोहळा या क्षणी पार पाडला .सातही दिवस हा सोहळा अगदी संगीतमय भक्तीमय अन् आंनदात पार पाडला .

कथेच्या सहाव्या दिवशी गांवातील तसेचं पंचक्रोशीतील देश सेवेसाठी सेवा देणार्या अनेक फौजीचा तसेचं त्यांच्या आई वडिलांचा सत्कार अन् देशसेवेसाठी आपल्या जीवनाचं योगदान देणार्या सैनिकांच ॠण ह्या ठिकाणी ह्या भव्य सोहळ्यांतून मेणबती लावून अन् राष्ट्रगीताच्या गजरात करण्यात आली.या सात दिवसात या ठिकाणाहून तरूणाईला देशभक्तीचं, व्यसनमुक्तिचं , प्रेमाचं , आयुष्यातील अनेक गोष्टींच तत्वज्ञान तसेचं प्रभावी जीवनाचे सुञ ही सांगण्यात आलं .अनेक तरूणाईला रूद्धांना स्ञी शक्तीला योग्य दिशा देण्यांच कामं या ठिकाणी करण्यांत आलं.

तसेचं 8 एप्रिल ला म्हणजेच सांगतेच्या दिवशी माजी आमदार अनिल कदम सोमनाथ आबा पानगव्हाणे यतिन कदम विविध श्रेञातील जेष्ठ श्रेष्ठ मंडळी या प्रसंगी उपस्थित होते .तसेच सातही दिवस नाशिक जिल्हायातील अनेक भक्त परिवार या प्रसंगी उपस्थित होते. या भव्य दिव्य सोहळ्यासाठी प्रत्येकांनी आपल्या परीने हे योगदान दिले.महाप्रसादाचं ही सुदरं असं नियोजन या प्रसंगी करण्यांत आलं होतं. ह्या प्रसंगी ग्रामपंचायत सदस्य हिंगलाज माता ट्रस्ट तसेचं हिंगलाजमाता विविध कार्यकारी सोसायटी यांच बहूमोल असं योगदानं तसेचं आपला संपूर्ण वेळ देऊन युवक वर्गांनी हा सोहळा पार पाडला.मुश्किलोंमो अकसर *अपनो के लिए तकलीफ सहतें हैं* !*इसलिऐ हम़ इसें एकता की मिसाल कहतें हैं!*अश्या प्रकारे भूतोनभविष्यती हा सोहळा हिंगलाजनगर येथे पार पाडला .

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!