शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढणार – पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार

शहरातील वाढती गुन्हेगारी मोडीत काढणार – पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार
कोपरगांव । विनोद जवरे ।
कोपरगाव शहरातील वाढती गुन्हेगारी पूर्णपणे मोडीत काढण्यासाठी कठोर पावले उचलणार असल्याचे नुकतेच कोपरगाव शहर पोलीस निरीक्षक म्हणून गुरुवार दिनांक १२ जून रोजी पदभार स्वीकारलेले पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांनी सांगितले.

याप्रसंगी त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, कोपरगाव शहरातील प्रत्येक भागात पोलिसांचे पेट्रोलिंग वाढवणार असून घरपोडी, चोरी करणाऱ्या वर आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे तसेच मोठ्या संख्येने व्यसनाधीनतेचे प्रमाण वाढले असून शहरात वेगवेगळ्या ठिकाणी रात्रीच्या वेळी होणाऱ्या मद्य पार्ट्यांवर करडी नजर पोलिसांची असणारा असून असे कृत्य करतांना कोणी मिळून आले तर त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. तसेच वाढत्या मोबाईल चोरी, सोनसाखळी चोरी, पाकीट मारी यावर देखील आळा घालण्यासाठी प्रयत्न करणार आहे तर नियम डावलून अवैद्यपणे वाहन चालवणाऱ्या चालका विरुद्ध देखील कडक कारवाई केली जाईल असा इशारा नव्याने हजर होत पदभार स्वीकारताच पोलीस निरीक्षक कुंभार यांनी चुकीचे कामे करणाऱ्यांना दिला आहे.
तर नव्याने हजर झालेले पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार यांचा महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. विश्वासराव आरोटे व जिल्हाध्यक्ष सोमनाथ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका अध्यक्ष जनार्दन जगताप, उपशहरध्यक्ष स्वप्निल कोपरे,तालुका सचिव प्रा विजय कापसे,विनोद जवरे, शहर संघटक रवी वाघडकर आदी राज्य पत्रकार संघटनेच्या कोपरगाव पदाधिकांऱ्यानी स्वागत केले आहे.