आश्वी बु ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी थोरात गटाचे बबनराव शिंदे
आश्वी बु ग्रामपंचायतच्या उपसरपंचपदी थोरात गटाचे बबनराव शिंदे

संगमनेर (प्रतिनिधी) -तालुक्यातील राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठेच्या असलेल्या आश्वी बुद्रुक या मोठ्या ग्रामपंचायतीच्या उपसरपंच पदी काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या गटाचे बबनराव शिंदे मोठ्या मताधिक्याने विजयी झाले असून यामुळे आश्वी बुद्रुक व परिसरात विखे गटाचे पानिपत झाले आहे.आश्वी बुद्रुक ही ग्रामपंचायत तालुक्यातील मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते माजी मंत्री लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली या गावच्या विकासासाठी युवक कार्यकर्ते विजय हिंगे यांच्या माध्यमातून सातत्याने काम होत आहे. गावातील विकास कामांसाठी लोकनेते बाळासाहेब थोरात माजी आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी कायम भरीव निधी दिला आहे आणि त्यातून अनेक मोठमोठे विकास कामे उभी राहिली आहेत. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची पद्धतीमुळे थोरात गटाचे सरपंच नामदेव शिंदे व सर्व सदस्यांच्या पुढाकारातून पुन्हा एकदा उपसरपंच पदी या गटाने बाजी मारत बबनराव शिंदे यांची मोठ्या मताधिक्याने निवड केली. यावेळी ग्रामपंचायत सरपंच नामदेव शिंदे,माजी उपसरपंच सौ अरुणाताई हिंगे, बाळासाहेब मदने, अजहरबाई शेख, अभिजीत ताजने ,अविनाश गायकवाड ,सौ दर्शना ताजने, परिघा गायकवाड, सौ केदारी जयश्री यांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
यानंतर बबनराव शिंदे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून अश्विनी मध्ये झालेली विकास कामे आणि सर्वांना सोबत घेण्याची पद्धत यामुळे ही जनता काँग्रेसच्या विचाराची आहे. अनेकांनी दहशत व पैशाच्या जोरावर राजकारण करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सामान्य जनतेने हाणून पाडला. हा जनशक्तीने धनशक्तीवर केलेला मोठा विजय असल्याचे ते म्हणाले.
बबनराव शिंदे यांच्या विजयासाठी युवक कार्यकर्ते विजय हिंगे, रिपाई नेते बाळासाहेब गायकवाड
राहुल जराड, शेतकी संघाचे संचालक बाळकृष्ण होडगर ,किशोर पाटील जराड ,योगेश पिलगर संतोष ताजणे, मार्केट कमिटीचे उपसभापती गीताराम गायकवाड ,माजी सरपंच महेश गायकवाड, पापा भाई शेख ,बाळासाहेब जराड ,भाऊसाहेब गायकवाड, सिताराम होडगर,नामदेवराव मदने, ब्रिज मोहन बिहानी, सोसायटीचे सर्व संचालक, रावसाहेब पंडित, अण्णासाहेब काशिनाथ जराड, सोमनाथ शेळके, अमरेश्वर मंडळाचे सर्व युवक कार्यकर्ते व ज्येष्ठ पदाधिकारी, बाबुराव काशिनाथ जराड, असलम भाई शेख यांनी विशेष परिश्रम घेतले
बबनराव शिंदे यांचे काँग्रेसचे नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात, मा. आमदार डॉ सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे ,डॉ.जयश्रीताई थोरात आदींसह विविध पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
धनशक्तीचा पराभव करून जनशक्ती जिंकली- विजय हिंगेलोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून आम्ही सातत्याने जनतेची कामे करतो. गावच्या विकासासाठी मोठा निधी मिळून अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. कधीही दुजाभाव केले नाही. सर्व समाजाला बरोबर घेतले. त्यामुळे आश्वी बुद्रुक गावातील सर्वसामान्य नागरिकांचा आमच्यावर मोठा विश्वास आहे. याउलट सत्तेचा आणि पैशाचा वापर करून दडपशाही निर्माण करणाऱ्या धनशक्तीचा पराभव सर्वसामान्य जनशक्तीने केले असल्याचे युवक कार्यकर्ते विजय हिंगे यांनी म्हटले आहे