ब्रेकिंग

बिबट्यांची नसबंदी करा – आमदार तांबे

जनआक्रोश मोर्चाने राज्य सरकारचे लक्ष वेधले

जाहिरात

बिबट्यांची नसबंदी करा – आमदार तांबे


जनआक्रोश मोर्चाने राज्य सरकारचे लक्ष वेधले

संगमनेर  । प्रतिनिधी । संगमनेर तालुक्यात वाढलेल्या बिबट्यांच्या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली असून सुमारे 12 नागरिकांनी आपला जीव गमावला आहे. बिबट्यांच्या पासून दहशतमुक्तते करता संगमनेर तालुक्यातील हजारो नागरिकांनी रस्त्यावर येऊन सरकार विरोधात आंदोलन केले याच वेळी बिबट्यांची मोजणी करून सर्वांची नसबंदी करा अशी मागणी आमदार सत्यजित तांबे यांनी केली तर महिला, विद्यार्थी यांना भयमुक्त करण्यासाठी शासनाने बिबट्यांबाबत ठोस उपाययोजना करावी अशी मागणी डॉ. जयश्रीताई थोरात यांनी केली आहे.

संगमनेर बस स्थानक येथे संगमनेर तालुका बिबट्याच्या दहशतमुक्ततेसाठी मोठे जन आक्रोश आंदोलन झाले. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, डॉ .जयश्रीताई थोरात, पांडुरंग पा घुले यांच्यासह संगमनेर तालुक्यातील सर्व पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व युवकांनी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.या मोर्चामध्ये सिद्धेश कडलक याचे लहानगे सर्व वर्गमित्र सहभागी झाले होते. याचबरोबर डॉ जयश्रीताई थोरात आपल्या लहान मुलासह मोर्चात  उपस्थित होत्या. बिबट्या हटाव, माणूस बचाव , बिबट्या मुक्त तालुका झालाच पाहिजे या घोषणांनी परिसर दुमदुमला.

यावेळी बोलताना आमदार सत्यजित तांबे म्हणाले की, बिबट्या आता जंगल सोडून शेतामध्ये वावरत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. शेतामध्ये काम करताना शेतकरी आणि महिला घाबरत आहे तर लहान मुलांचे अंगणामध्ये खेळणे सुद्धा बंद झाले आहे. दररोज बिबट्याच्या हल्ल्याच्या घटना घडत असताना सरकार मात्र उदासीन आहे. बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्याबाबत आपण केंद्रीय वनमंत्री भूपेंद्र यादव यांची भेट घेऊन नसबंदी करण्याची मागणी केली होती. अहिल्या नगर जिल्ह्यातील संगमनेर अकोले पट्ट्यामध्ये बिबट्यांचे मोठे प्रमाण असून राज्य शासनाने नसबंदी करण्यासाठी पुढाकार घेतला पाहिजे. याचबरोबर पकडलेल्या बिबट्याना दूर देऊन सोडला पाहिजे. नागरिकांचे जीव जात असताना प्रशासन मात्र असंवेदनशील झाले आहे. नरभक्षक बिबट्यांना मारण्याची परवानगी द्यावी तसेच शेतकऱ्यांना स्वसंरक्षणासाठी बंदुकीची परवानगी द्यावी अशी मागणी ही आमदार सत्यजित तांबे यांनी यावेळी केली.तर डॉ. जयश्रीताई थोरात म्हणाल्या की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली बिबट्या पासून दहशतमुक्ती करता सातत्याने तालुक्यात आंदोलन होत आहे. मागील एका वर्षामध्ये 12 नागरिकांनी जीव गमावले असून अनेक नागरिकांवर हल्ले झाले आहेत. आजच्या मोर्चामध्ये आम्ही राजकीय पदाधिकारी नाही तर आई म्हणून आलो आहोत. सिद्धेश कडलक आणि इतर बिबट्यांच्या हल्ल्याबद्दल मृत कुटुंबीयांची काय अवस्था असेल याची कल्पना प्रशासनाला नाही त्यामुळे प्रशासन उदासीन आहे. संगमनेर तालुका हा दुधाचा तालुका असून अनेक शेतकरी महिला शेतामध्ये काम करतात बिबट्यांमुळे त्यांच्यामध्ये मोठी भीती निर्माण झाली आहे. हे सर्व बिबटे पकडा आणि गुजरात मधील वन तारामध्ये देऊन सोडा याचबरोबर कायमस्वरूपी प्रभावी बंदोबस्त करा अशी मागणी त्यांनी केली.माजी आमदार डॉ तांबे म्हणाले की, सह्याद्रीच्या पायथ्याशी असल्याने या भागामध्ये बिबट्यांचा वावर खूप मोठ्या प्रमाणात वाढला आहे. बिबट्यांच्या हल्ल्यामध्ये अनेकांनी प्राण गमावले असून सरकार मात्र याबाबत काहीही करत नाही. ही अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे. प्रशासनाचा इतका उदासीनपणा कधीच पाहिला नसल्याचे ते म्हणाले.यावेळी अनेक महिला, युवक व नागरिकांनी आपले मनोगते व्यक्त करत सरकार आणि वर विभागाच्या कारभारावर ताशेरे ओढले. हजारोंच्या संख्येने रस्त्यावर उतरलेल्या नागरिकांनी संगमनेर बस स्थानक ते प्रांत कार्यालय येथे भव्य मोर्चा काढून कायमस्वरूपी बंदोबस्त करावा ही मागणी केली.

 

मयत सिद्धेश च्या लहानग्या मित्रांचा आक्रोश.

जवळे कडलग येथील सिद्धेश कडलक याचे वर्गमित्र मोठ्या संख्येने मोर्चामध्ये सहभागी झाले होते. आमच्या सिद्धेश ला परत आना, त्याला न्याय द्या. असे म्हणताना या सर्व लहान मुलांना अश्रू आणावर झाली यावेळी उपस्थित सर्वांच्या डोळ्यात पाणी आले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!