ब्रेकिंग

कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी सहकाराच्या पंढरीत भक्ती सेवेचा वटवृक्ष उभा केला – ह.भ.प.अनंत महाराज वहाडणे

कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी सहकाराच्या पंढरीत भक्ती सेवेचा वटवृक्ष उभा केला – ह.भ.प.अनंत महाराज वहाडणे

जाहिरात मो-7756045359

कर्मवीर काळे कारखाना कार्यस्थळावर ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याची काल्याच्या कीर्तनाने सांगता

कोपरगांव । प्रतिनिधी । लोकांची सेवा हीच खरी भक्ती आणि जनकल्याण हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. काळे परिवाराने जपलेला हा सेवाभावाचा वारसा आमदार आशुतोष काळे यांच्या माध्यमातून पुढेही असाच सुरू राहील. त्यांच्या जनसेवेची ही वाटचाल त्यांच्या उज्ज्वल भवितव्याची नांदी ठरेल असे प्रतिपादन ह.भ.प. अनंत महाराज वहाडणे यांनी केले.श्री.क्षेत्र खेडले झुंगे येथील ब्रम्हलीन परमपूज्य गुरुवर्य तुकारामबाबा व स्व. शंकरराव काळे यांच्या प्रेरणेतून कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे व आ.आशुतोष काळे यांच्या सहकार्यातून गौतम बँकेच्या माजी संचालिका सौ.पुष्पाताई काळे यांच्या मार्गदर्शनाखाली कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व कोसाका सांस्कृतिक, शैक्षणिक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबाद प्रमाणे याहीवर्षी कारखाना कार्यस्थळावरील श्री भगवान विष्णू मंदिरात श्री.संत शिरोमणी नामदेव महाराज व श्री. संत शिरोमणी सावता महाराज यांच्या पुण्यतिथी उत्सवा निमित्त शुक्रवार (दि.०७) ते शुक्रवार दि.(१४) या कालावधीत ५१ व्या भव्य ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून या सोहळ्याची सांगता ह.भ.प.अनंत महाराज वहाडणे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तन सेवेने हजारो भाविकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात संपन्न झाली याप्रसंगी ते बोलत होते.

ते पुढे म्हणाले, माजी खासदार स्व. कर्मवीर शंकरराव काळे साहेबांनी कोपरगाव तालुक्यात सहकाराची पंढरी फुलवली आणि या पंढरीत भक्ती व सेवेचा वटवृक्ष उभा केला. स्व.सौ.सुशिलामाई यांनी या वटवृक्षाला प्रेम, संस्कार आणि सेवाभावाचे खतपाणी घालून संपूर्ण परिसराला भक्तीचा आणि समाजसेवेचा मार्ग दाखविला. याच समृद्ध वारशाला पुढे नेत माजी आमदार अशोकराव काळे यांनी परिसराचा तसेच संपूर्ण तालुक्याचा सर्वांगीण व भक्कम विकास साधला. हाच विकासाचा आणि जनसेवेचा वारसा आमदार आशुतोष काळे समर्थपणे पुढे चालवत आहेत. कोरोना संकटाच्या काळात आमदार आशुतोष काळे यांनी जनतेच्या आरोग्याची घेतलेली काळजी, रुग्णांसाठी उपलब्ध करून दिलेल्या विविध सुविधा आणि केलेली निस्वार्थ सेवा ही अत्यंत मोलाची आणि कौतुकास्पद आहे. संकटाच्या काळात जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, गरजूंची सेवा करणे आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहणे, हीच खरी सेवा आणि हीच खरी भक्ती असल्याचे त्यांनी सांगितले.मागील पाच दशकापासून कर्मवीर शंकररावजी काळे साहेब यांनी कारखाना कार्यस्थळावर सुरु केलेली अखंड पारायणाची धार्मिक परंपरा माजी आमदार अशोकराव काळे व कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आमदार आशुतोष काळे यांनी आजतागायत सुरु ठेवली असून याहीवर्षी हा पारायण सोहळा आयोजित करण्यात आला होता.शुक्रवारी सकाळी १० ते १२ या वेळेत ह.भ.प. अनंत महाराज वहाडणे महाराज यांच्या काल्याच्या कीर्तनाने पारायणाची सांगता झाली. महाराजांनी आपल्या रसाळ,अभ्यासपूर्ण आणि भावपूर्ण निरुपणातून श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनकार्यावर व ज्ञानेश्वरीतील तत्त्वज्ञानावर प्रकाश टाकला. संत ज्ञानेश्वरांचे विचार हे मानवी जीवनाला योग्य दिशा देणारे दीपस्तंभ आहेत असा संदेश त्यांनी कीर्तनातून दिला. कीर्तनाच्या उत्तररंगात झालेल्या गोपाळकाला आणि टाळ-मृदंगाच्या गजराने संपूर्ण परिसर भक्ती रसात न्हाऊन निघाला. यावेळी कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखाना व उद्योग समुहाचे मार्गदर्शक माजी आमदार अशोकराव काळे यांच्या हस्ते ह.भ.प.अनंत महाराज वहाडणे महाराज यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष दिनार कुदळे व कारखाना पदाधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कीर्तन सेवा झाल्यानंतर उपस्थित सर्व भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. सहभागी पारायणार्थी व परिसरातील भाविकांसह नागरिकांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!