ब्रेकिंग

तिरंगा रॅलीतून समृध्द, विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प – ना.विखे पाटील

तिरंगा रॅलीतून समृध्द, विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प – ना.विखे पाटील

जाहिरात मो-7756045359

अहील्यानगर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्त्यांचा सहभाग!

लोणी । प्रतिनिधी । भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण देशात आयोजित करण्यात आलेल्या तिरंगा रॅलीच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सक्षम, समृध्द आणि विकसित राष्ट्र बनिण्यासाठी योगदान देण्याचा संकल्पकेला असल्याचे जलसंपदा तथा पालक मंत्री ना राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.लाल किल्ल्यावरून वंदे मातरम् गायनाचा निर्णय मातृभूमीचा गौरव आणि राष्ट्रीय स्वाभिमान वाढविणारा असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.


छत्रपती संभाजीनगर मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅली जलसंपदा तथा पालक मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील, प्रदेश उपाध्यक्ष डॉ सुजय विखे पाटील यांच्यासह अहील्यानगर जिल्ह्यातून असंख्य कार्यकर्ते सहभागी झाले होते.भारताच्या ८०व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमिताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हर घर तिरंगा उपक्रमाचे आवाहन केले होते.प्रत्येक नागरिकांने घरावर तिरंगा फडकावून देशाप्रती कृतज्ञता व्यक्त असल्याचे सांगून मंत्री विखे पाटील म्हणाले की, भारतीय जनता पक्षाच्या वतीने संपूर्ण राज्यात काढण्यात आलेल्या तिरंगा रॅलीतून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताला सक्षम समृध्द आणि विकसित राष्ट्र बनविण्याचा संकल्प करण्यात आला आहे.

यावर्षीचा स्वातंत्र्य दिन साजरा करताना वंदे मातरम् या गीताला १५० वर्ष पूर्ण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने ऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून वंदे मातरम् गीत म्हणण्याचा केलेला निर्णय हा प्रत्येक भारतीयासाठी अंत्यत अभिमानास्पद आणि चैतन्यदायी असल्याची प्रतिक्रीया मंत्री विखे पाटील यांनी व्यक्त केली.वंदे मातरम् हेमगीत केवळ शब्दांची रचना नसून,आपल्या मातृभूमी प्रति असलेला अथांग प्रेम, त्याग आणि समर्पणाची भावना आहे.भारतीय स्वातंत्र्य लढ्यात देशातील क्रांतिकारकांना आणि स्वातंत्र्य सैनिकांना एका सूत्रात बांधणारा मूलमंत्र वंदे मातरम् मध्ये सामावला आहे.केंद्र सरकारने वंदे मातरम् गीताला १५० वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर लाल किल्ल्यावरून वंदे मातरम् गायनाचा निर्णय केलाच, पण यापेक्षाही महत्वाचे म्हणजे शासकीय आणि सार्वजनिक कार्यकर्माची सुरूवात वंदे मातरम् गीताने करण्याचा केलेला निर्णय राष्ट्र प्रेमाची आणि समृध्द इतिहासाची प्रेरणा देणारी असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!