ब्रेकिंग

संगमनेरात 10 इ – टॉयलेट सह भव्य क्रीडांगण होणार – आमदार तांबे

आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेरात 10 ई - टॉयलेटसाठी एक कोटींचा निधी

संगमनेरात 10 इ – टॉयलेट सह भव्य क्रीडांगण होणार – आमदार तांबे

संगमनेरात 10 इ – टॉयलेट सह भव्य क्रीडांगण होणार – आमदार तांबे

आ.सत्यजित तांबे यांच्या पाठपुराव्यामुळे संगमनेरात 10 ई – टॉयलेटसाठी एक कोटींचा निधी

संगमनेर ( प्रतिनिधी ) लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना सातत्याने राबवल्या गेल्या आहेत. त्यामुळे संगमनेर शहर हे वैभवशाली ठरले आहे. याचबरोबर स्वच्छतेसाठी नगरपरिषदेला विविध पारितोषिके मिळाले आहेत. शहरातील नागरिकांची वर्दळ लक्षात घेऊन जनतेच्या सोयीसाठी आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा करून दहा ई – टॉयलेटसाठी एक कोटी रुपयांचा निधी व जोर्वे नाका येथे भव्य क्रीडांगण विकसित करण्याकरता एक कोटी रुपयांचा निधी मिळवला आहे. यामधून संगमनेर शहरात अद्यावत 10 ई – टॉयलेटसह भव्य क्रीडांगण उभे राहणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.याबाबत दिलेल्या माहिती बाबत आमदार सत्यजीत तांबे म्हणाले की, लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात विकसित व वैभवशाली शहर आहे. येथे मोठी बाजारपेठ सुरक्षितता व विश्वास असल्याने नागरिकांची सातत्याने मोठी वर्दळ असते. येणाऱ्या नागरिकांची टॉयलेटची व्यवस्था व्हावी याकरता आमदार सत्यजित तांबे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे 30 जानेवारी 2024 रोजी 10 इ टॉयलेट साठी एक कोटी रुपये निधी व जोर्वे नाका येथील परिसरात भव्य क्रीडांगण विकसित करणे कामी करता 1 कोटी रुपयांच्या निधीची मागणी केली होती. यावर तत्कालीन मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देत 21 फेब्रुवारी 2024 रोजी या कामांना निधी मंजूर केला.परंतु लोकसभा विधानसभा निवडणुक आचार संहिता आणि प्रशासकीय विलंबामुळे हे काम थांबले होते मात्र आता नव्याने हे काम सुरू होणार आहे. त्यामुळे संगमनेर शहरातील नागरिकांसाठी आता अत्याधुनिक असे दहा इ टॉयलेट उभे राहणार असून जोरवे नाका परिसरात भव्य क्रीडा संकुल साकार होणार आहे. या ई – टॉयलेट मध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला असून स्मार्ट सेन्सर तंत्रज्ञान, टचलेस ऑपरेशनसाठी सोलर लाइटिंग सिस्टीम व पर्यावरण पूरक ऊर्जा वापरण्यासाठी वॉटर रिसायकलिंग युनिटचा वापर करण्यात येणार आहे. यामुळे नागरिकांची सोय होणार आहे. याचबरोबर तरुणांना खेळण्यासाठी जोर्वे नाका परिसरात भव्य क्रीडांगण निर्माण होणार असल्याची माहिती आमदार सत्यजीत तांबे यांनी दिली आहे.

नवीन लोकप्रतिनिधीने दिशाभूल करू नये

लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहरात अनेक विकासाच्या योजना राबवल्या जात आहेत. आमदार सत्यजित तांबे यांनी 31 जानेवारी 2024 मध्येच या कामाचा पाठपुरावा केला. त्याला नगरविकास विभागाने 21 फेब्रुवारी 2024 मध्येच मंजुरी दिली. नवीन लोकप्रतिनिधी हे 23 नोव्हेंबर 2024 नंतर झाले. जुन्या कामांच्या विकास निधीसाठी पाठपुरावा हा लोकनेते बाळासाहेब थोरात व आमदार सत्यजीत तांबे यांनी केला आहे. नवीन लोकप्रतिनिधीने अर्थसंकल्पामध्ये नवीन निधी मिळवावा मग जाहिरात बाजी करावी अशी प्रतिक्रिया शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिला आहे.

आ.सत्यजीत तांबे यांच्या मागणीचे पत्र व्हायरल

आमदार सत्यजित तांबे यांनी 31 जानेवारी 2024 रोजी या कामाच्या निधीसाठी जे पत्र दिले होते त्याला तत्कालीन मुख्यमंत्री यांनी दिलेल्या मंजुरीचे पत्र सुद्धा असून ते मंजुरीचे पत्र सोशल माध्यमांवर सर्वत्र झळकत आहेत.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!