सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श प्राचार्य पुरस्कार
सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श प्राचार्य पुरस्कार
सात्रळ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान शिंगोटे यांना राष्ट्रीय स्तरावरचा आदर्श प्राचार्य पुरस्कार
लोणी । प्रतिनिधी । लोकनेते पद्मभूषण बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेच्या सात्रळ येथील कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सोपान नारायण शिंगोटे यांना शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक आणि संशोधनात्मक कार्याबद्दल पुणे येथील ग्लोबल फाउंडेशन या संस्थेकडून राष्ट्रीय स्तरावरील आदर्श प्राचार्य पुरस्कार प्राप्त झाला आहे.प्राचार्य डॉ. शिंगोटे यांना पंचवीस वर्षाचा अध्यापन अनुभव असून त्यांनी तीन पुस्तके लिहिली आहेत. भौगोलिक पर्यावरण या विषयाच्या अनुषंगाने त्यांचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय स्तरावर शोधनिबंध प्रकाशित झालेले आहेत. डॉ. शिंगोटे यांच्या प्राचार्य पदाच्या कालावधीत नुकताच सात्रळ महाविद्यालयाला नॅक पुनर्मूल्यांकन समितीकडून तिसऱ्यांदा ‘अ’ श्रेणी मानांकन प्राप्त झालेले आहे.
सदरचा आदर्श प्राचार्य राष्ट्रीय पुरस्कार पुणे येथील गांधी भवनमध्ये अल-कुद्स युनिव्हर्सिटी, पॅलेस्टाईन येथील प्रा.डॉ.मुनथेर मोहद इब्राहिम, महाराष्ट्र भूगोलशास्त्र परिषद व पॅनजिया जिओग्राफिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.प्रवीण सप्तर्षी, श्रीलंकेतील केलोनिया युनिव्हर्सिटीचे प्रा.डॉ.ए.जी.अमरसिंघे, गोव्याचे उच्च शिक्षण संचालक प्रा.डॉ.एफ.एम.नदाफ यांच्या शुभहस्ते प्रदान करण्यात आला.डॉ . शिंगोटे यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाध्यक्ष सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री तसेच अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. ना. डॉ. राधाकृष्ण विखे पाटील, मा. मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, जिल्हा परिषदेच्या मा. अध्यक्षा सौ. शालिनीताई विखे पाटील, प्रवरा अभिमत विद्यापीठाचे कुलपती डॉ. राजेंद्र विखे पाटील, मा. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुश्मिता विखे पाटील, सहसचिव श्री. भारत घोगरे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष, सर्व पदाधिकारी, पंचक्रोशीतील कार्यकर्ते आणि पालक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, शिक्षण संचालक डॉ. प्रदीप दिघे, सहकारी प्राध्यापक, सेवक वृंद तसेच विद्यार्थी-विद्यार्थिनींनी अभिनंदन केले आहे.
पुरस्कार सामूहिक कामाचा
सहकार चळवळीचे जनक पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील यांनी ग्रामीण भागात औद्योगिक प्रगती करत शैक्षणिक विकास कार्याची दिशा दाखवली. पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार, कृषी, जलसिंचन आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाला राष्ट्रीय स्तरावर वाचा फोडली. आम्हा सर्वांचे मार्गदर्शक, संस्थेचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या दूरदृष्टीने सात्रळ महाविद्यालयाची शैक्षणिक वाटचाल सुरू असून हे महाविद्यालय सात्रळ पंचक्रोशीत पालक व विद्यार्थीप्रिय असे झाले आहे. खर तर मला मिळालेला हा पुरस्कार सामूहिक कामाचा असून, यापुढील काळात काम करण्यासाठी आणखी ऊर्जा देईल, अशी भावना प्राचार्य डॉ . सोपान शिंगोटे यांनी व्यक्त केली.