ब्रेकिंग

मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संत महंतांचे कार्य पुढे नेले – स्वामी काशीकानंद महाराज

संत परंपरा व मानवतेचा विचार पुढे नेण्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे योगदान

मा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी संत महंतांचे कार्य पुढे नेले – स्वामी काशीकानंद महाराज

संत परंपरा व मानवतेचा विचार पुढे नेण्यासाठी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांचे योगदान
संगमनेर । प्रतिनिधी । थोरात परिवार हा वारकरी संप्रदायाचा पाईक आहे. सर्वांना बरोबर घेऊन मानवतेच्या कल्याणाचे काम ते सदैव करत आहेत. समाजकारणातून सेवा करणाऱ्या माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम संत व महंत यांचा समाजाच्या कल्याणाचा विचार पुढे नेण्याचे कार्य करत असल्याचे प्रतिपादन महंत श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी काशीकानंद महाराज यांनी काढले आहे.

सुदर्शन निवासस्थानी साई दिंडीमध्ये मृत पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत मिळवून देणे, याचबरोबर वारकऱ्यांना तातडीने मदत केल्याबद्दल महंत काशीकानंद महाराज यांनी लोकनेते बाळासाहेब थोरात यांची भेट घेऊन त्यांना आशीर्वाद दिले. यावेळी समवेत सुभाष पाटील कुटे, राजेंद्र कहांडळ कुटे आदींसह भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते.

2 नोव्हेंबर 2023 मध्ये साई पालखी दिंडी सोहळ्यामधून अनेक वारकरी आळंदी या ठिकाणी जात होते. यावेळी घारगाव जवळ 19 मैल येथे रोजी भरघाव वेगाचा ट्रक वारकरी दिंडीत घुसल्याने चार वारकऱ्यांचा जागीच मृत्यू झाला होता. ही घटना कळताच माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी आपले यशोधन कार्यालय व सर्व यंत्रणेला तातडीने मदतीच्या सूचना दिल्या. त्यानुसार सर्व वारकऱ्यांना तातडीने दवाखान्यात हालवण्यात आले. याचबरोबर मदत करण्यात आली. रात्री एक वाजता स्वतःमा.मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दवाखान्यांमध्ये जाऊन सर्व जखमी वारकऱ्यांची आस्तेवाईकपणे चौकशी केली.याचबरोबर या अपघातामध्ये मृत पावलेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबांना मदत मिळावी याकरता विधानसभेमध्ये आवाज उठवला. त्यामुळे मृत वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना सरकारने 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली. या सर्व वारकऱ्यांच्या कुटुंबीयांची माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले व ही मदत मिळून देण्यात आली. याचबरोबर काशीकानंद महाराज यांची शिर्डी येथे जाऊन त्यांनी भेट घेतली.यानंतर या दिंडीचे प्रमुख काशीकानंद जी महाराज यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या निवासस्थानी त्यांना आशीर्वाद दिले. याप्रसंगी ते म्हणाले की, थोरात परिवाराला मोठा वारकरी संप्रदायाचा वारसा आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी कायम संत महंत यांचा आदर केला आहे. वारकरी संप्रदायाचा विचार पुढे नेला आहे. मानवतेच्या कल्याणाचे कार्य ते करत आहे. अशा समाजासाठी योगदान देणारे व्यक्तिमत्व हे खरे आदर्श आहेत. वारकरी दिंडी मध्ये झालेल्या दुर्घटनेच्या वेळी माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अत्यंत तातडीने मदत केली होती. याचबरोबर आपल्या कार्यमग्नतेतून वेळ काढून रात्री एक वाजता भक्तांच्या भेटीला ते आले होते. जनतेप्रति ही तळमळ आत्मीयता आणि श्रद्धा असल्यामुळे घडून येते. यावेळी त्यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी भक्तगण मोठ्या संख्येने उपस्थित होते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी स्वामी महाराजांचा सत्कार केला.
बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!