ब्रेकिंग

आ.थोरात यांच्या प्रयत्नातून भोजापूर चारीला पाणी

ओव्हरफ्लोचे पाणी मिळणार असल्याने दुष्काळी गावांना दिलासा

आ.थोरात यांच्या प्रयत्नातून भोजापूर चारीला पाणी

संगमनेर । प्रतिनिधी ।

काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली दरवर्षी थोरात सहकारी साखर कारखान्याच्या मदतीने निमोन – तळेगाव पट्ट्यातील गावांना भोजापूर चारीद्वारे धरणाचे पाणी देण्यासाठी काम झाले आहे. यावर्षीही काँग्रेस पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्न व पाठपुराव्यातून भोजापुरच्या चारीला ओव्हरफ्लोचे पाणी सोडण्यात आल्याने दुष्काळग्रस्त गावांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

भोजापुर धरण हे निमोण परिसरातील गावांसाठी वरदान ठरले आहे. यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला मात्र पावसाळ्याच्या उत्तरार्धात पट्टा किल्ला परिसरात चांगला पाऊस झाल्याने भोजापुर धरण पूर्ण क्षमतेने भरले आहे. यावर्षी संपूर्ण तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाला आहे. त्यामुळे दुष्काळाची परिस्थिती निर्माण होते की काय अशी भीती आहे. यावर तातडीने उपाययोजना व्हावी याकरता मा. महसूलमंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी निळवंडे धरणातून डाव्या कालव्याद्वारे तातडीने पाणी सोडावे अशी मागणी सरकारकडे केली होती. समवेत टंचाई आढावा बैठक घेऊन पिण्याचे पाणी जनावरांचा चारा व रोजगार हमीच्या कामाबाबत प्राधान्यक्रम द्यावे अशा सूचना प्रशासनाला दिल्या होत्या.निमोण पंचक्रोशीतील गावांसाठी भोजापुर धरणातून तातडीने पाणी सोडावे अशी मागणी शासनाकडे केली होती. याच मागणीसाठी निमोन, नान्नज दुमाला, तळेगाव परिसरातील विविध गावांमधील शेतकरी व कार्यकर्त्यांनी एकत्र येत तातडीने पाणी सोडण्याची मागणी केली होती. यासाठी गावोगाव बैठकही झाल्या.
आमदार बाळासाहेब थोरात यांचा सततचा पाठपुरावा व सोबत कार्यकर्त्यांची मागणी यामुळे प्रशासनावर दबाव येऊन धरण पूर्ण क्षमतेने भरल्याने भोजापुर चारीला ओव्हरफ्लोचे पाणी सुटले आहे. यामुळे सोनेवाडी, पळसखेडे,निमोन,क-हे,पिंपळे, नान्नज या गावांबरोबरच उर्वरित गावांमध्येही ओव्हरफ्लोचे पाणी येणार आहे.यावेळी बी.आर.चकोर म्हणाले की, काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने या चारीच्या कामांसाठी पाठपुरावा केला आहे. कारखान्याच्या माध्यमातून दरवर्षी चारी रुंदीकरण व दुरुस्तीसाठी मदत केली आहे. याचबरोबर पाच गावांकरता थेट पाईपलाईन योजनाही कार्यान्वित केली आहे.निमोन तळेगाव परिसरातील गावांचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांचा सातत्याने पाठपुरावा असून त्यांनी कधीही प्रसिद्धी केली नाही मात्र काही लोक काम न करता प्रसिद्धी करतात अशी टीकाही त्यांनी केली आहे.


निळवंडे धरणातून पाणी सोडण्याची आ.थोरात यांची मागणी

निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते जलनायक आ.बाळासाहेब थोरात यांनी दुष्काळी परिस्थितीत जनतेला दिलासा देण्याकरता शासनाने तातडीने निळवंडे धरणाच्या डाव्या कालव्यातून पाणी सोडावे अशी मागणी केली आहे. सध्या भंडारदरा व निळवंडे धरण हे पूर्ण क्षमतेने भरले असून कोणतेही राजकारण न करता ओव्हरफ्लोचे पाणी तातडीने दुष्काळी भागाला मिळावी अशी आग्रही मागणी जलनायक आ. थोरात यांची सरकारकडे आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!