लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत मंगळवारी स्नेहसंवाद मेळावा


याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणारे निळवंडे धरण व डावा आणि उजवा कालवा हा लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी पूर्ण करून दुष्काळी भागातील जनतेला पाणी दिले आहे. त्यांच्या कारकिर्दीतील हा सर्वात मोठा ऐतिहासिक ठेवा ठरला असून संगमनेर शहरात हायटेक बस स्थानक, विविध वैभवशाली इमारती,बायपास व तालुक्यात अनेक मोठमोठे विकासाची कामे केली आहे. याचबरोबर ग्रामीण विकासातून प्रगती साधताना तालुक्याची बाजारपेठ समृद्ध केली आहे. तालुका हा परिवार मानून प्रत्येकाच्या सु:ख दुःखात ते नेहमी सहभागी झाले आहेत.
विधानसभेच्या अनपेक्षित निकालाने तालुका हळहळला आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवार दिनांक 3 डिसेंबर 2024 रोजी दुपारी 3 वाजता यशोधन जवळील ग्राउंडवर तालुक्यातील महाविकास आघाडीतील सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचा स्नेहसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला आहे.यावेळी संगमनेर तालुक्यातील सर्व महाविकास आघाडीचे पदाधिकारी,काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी तसेच अमृत उद्योग समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी, समाजसेवी संस्थांचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी राज्यभरातूनही अनेक मान्यवर येणार आहेत.तरी मंगळवारी दुपारी 3 वाजता होत असलेल्या या स्नेहसंवाद मेळाव्यासाठी तालुक्यातील सर्व नागरिक बंधू – भगिनी व युवक यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन संगमनेर तालुका व शहर काँग्रेस कमिटी, महाविकास आघाडी, लोकनेते नामदार बाळासाहेब थोरात मित्र मंडळ, व अमृत उद्योग समूहाच्या वतीने करण्यात आले आहे.