ब्रेकिंग
अनिकेत खामकर यांची कोपरगाव युवा सेनेच्या गटप्रमुख पदी निवड

अनिकेत खामकर यांची कोपरगाव युवा सेनेच्या गटप्रमुख पदी निवड

कोपरगांव । प्रतिनिधी ।
महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे, माजी खासदार सदाशिवराव लोखंडे, शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली कोपरगाव तालुका युवा सेनेच्या गटप्रमुख पदी अनिकेत खामकर यांची निवड करण्यात आली.

युवा सेनेचे उत्तर नगर जिल्हा प्रमुख शुभम वाघ यांच्या वतीने त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. या पदाची जबाबदारी आपण यशस्वीपणे स्वीकारून शिवसेना पक्ष संघटना बळकट करण्यासाठी जनसामान्यापर्यंत पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवण्याचे काम करून पक्ष संघटना वाढीसाठी प्रयत्न कराल असा विश्वास या पत्रातून शुभम वाघ व्यक्त केला. शिवसेना पक्षाने दिलेली जबाबदारी पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्या आशीर्वादाने व माजी खासदार सदाशिवराव लोखंडे व शिवसेना जिल्हाप्रमुख नितीनराव औताडे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तमरीत्या पार पाडून पक्ष वाढीसाठी प्रयत्न करणार असल्याचे कोपरगाव तालुका युवा सेना गटप्रमुख म्हणून अनिकेत खामकर यांनी सांगितले.