ब्रेकिंग

अमृत उद्योग समूहाची ६३ वर्षाची रचनात्मक वाटचाल

संगमनेर । प्रतिनिधी ।

थोर स्वातंत्र सैनिक भाऊसाहेब थोरात यांनी संगमनेर तालुक्यात विकासाचा मंत्र घुमवून शेतकरी, कष्टकरी, शेतमजूर व कामगार यांच्यासाठी उभारलेली प्रतिसृष्टी म्हणजे अमृत उद्योग समूह होय. या उद्योग समूहाची अथक ६३ वर्षाची रचनात्मक वाटचाल जलनायक माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे सुरू आहे. संपूर्ण राज्यभरात अमृत उद्योग समूह सहकारातील एक अग्रगणने संस्था म्हणून नावलौकिक मिळवला आहे या संस्थेअंतर्गत सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना लिमिटेड अमृत नगर, संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक व प्रक्रिया संघ मर्यादित संगमनेर, अमृतवाहिनी शेती व शिक्षण विकास संस्था अमृतनगर, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहीणी सहकारी बँक लिमिटेड अमृतनगर, सौ मथुराबाई भाऊसाहेब थोरात सेवाभावी ट्रस्ट, संगमनेर शेतकरी शेतकी संघ संगमनेर, संगमनेर ॲग्रीकल्चर प्रोडूस ट्रान्सपोर्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अमृतनगर, राजहंस अग्रिकल्चर ट्रान्सपोर्ट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड अमृत नगर, संगमनेर तालुका अग्रिकल्चर प्रोडूसर प्रोसेसिंग मार्केटिंग को ऑफ सोसायटी मर्यादित संगमनेर, गरुड सहकारी कुक्कुटपालन व्यवसायिक संस्था लिमिटेड घुलेवाडी, सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक समाज संगमनेर, हरिश्चंद्र सहकारी पाणीपुरवठा संस्थांचे सहकारी फेडरेशन आदी संस्था यशस्वीपणे मार्गक्रमण करत आहे.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!