ब्रेकिंग

आशुतोष काळे आमदार तर होणारच आहे परंतु ते मंत्री पण झाले पाहिजे – अभिनेते भाऊ कदम

आशुतोष काळे आमदार तर होणारच आहे परंतु ते मंत्री पण झाले पाहिजे – अभिनेते भाऊ कदम

कोपरगांव । प्रतिनिधी ।

महाराष्ट्र राज्याला प्रगतीच्या शिखरावर घेवून जाण्याची धमक आणि काम करण्याची ताकद उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे असून त्यांचा हाथ आ. आशुतोष काळे यांच्या पाठीवर आहे. हे आ.आशुतोष काळे यांनी केलेल्या कामावरून दिसून येते. त्यामुळे ते आमदार तर होणारच आहे परंतु ते मंत्री पण झाले पाहिजे आणि अजित दादांचे हाथ बळकट झाले पाहिजे यासाठी त्यांचे सर्व शिलेदार मोठ्या मताधिक्याने निवडून येणे गरजेचे आहे. आ.आशुतोष काळे निवडून येणार आहे पण त्यांना मंत्री करायचे आहे त्यासाठी आ.आशुतोष काळे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून द्या असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे (अजित पवार गट) स्टार प्रचारक व मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांनी केले.

 कोपरगाव विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे राष्ट्रावादी कॉंग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार आ.आशुतोष काळे यांच्या प्रचारार्थ मतदार संघातील राहाता तालुक्यातील पुणतांबा येथे आ.आशुतोष काळे यांच्या समवेत मराठी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते भाऊ कदम यांच्या जुने रेल्वे गेट पासून प्रचार रॅलीस प्रारंभ होवून स्टेशन रस्त्यावरून प्रचार फेरी काढण्यात आली होती. या प्रचार फेरीचे नेहरू चौकात छोटेखानी सभेत रूपांतर झाले यावेळी नागरिकांशी संवाद साधतांना ते बोलत होते. ते म्हणाले की, अहिल्यानगर जिल्ह्यातील उत्तर काशी संबोधल्या जाणाऱ्या पुणतांबा नगरीच्या तीर्थक्षेत्रामध्ये मी जेव्हा आलो तेव्हा मला जाणवले की या ठिकाणी पुरेपूर विकास झालेला आहे. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याकडे राज्याच्या विकासाचे व्हिजन असून त्यांची ताकद वाढवायची आहे आणि .काळे यांना देखील मंत्री करायचे आहे. त्यामुळे  कोपरगाव मतदार संघाच्या सुजाण मतदारांनी विकासाच्या बाजूने उभे राहून आ.आशुतोष काळे यांना मोठे मताधिक्य द्यावे.

यावेळी .आशुतोष काळे म्हणाले की, कोपरगाव मतदार संघातील इतर गावांप्रमाणे राहाता तालुक्यातील अकरा गावांना देखील समान न्याय दिला आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,महसूल मंत्री ना.राधाकृष्ण विखे पाटील यांचे मोठे सहकार्य मिळाले आहे. या भागाचा अद्यापही संपूर्ण विकास झालेला नाही. पहिले दोन वर्ष कोरोना महामारीमुळे निधी मिळण्यात काहीसा विलंब झाला असला तरी त्यानंतर ती कसर भरून काढली असून या अकरा गावातील रस्ते, पाणी, वीज व तीर्थक्षेत्र विकासाला कोपरगाव तालुक्यातील गावांच्या बरोबरीत निधी दिला आहे. यामध्ये प्रामुख्याने वाकडी-रामपूरवाडी-पुणतांबा (एमडीआर- ८७) मजबुतीकरण करणे, गणेशनगर वाकडी रस्ता, वाकडी येथील श्री खंडोबा महाराज देवस्थान विकास, जळगाव-पुणतांबा-राहता-चितळी रोड,शिंगवे-वारी रस्तारामपूरवाडी- पुणतांबा रस्ता-नपावाडी-पुणतांबा रस्ता चांगदेव महाराज समाधी परिसर सभामंडप व स्वच्छतागृह, वाकडी येलमवाडी-पुणतांबा (ग्रामा ६३), पुणतांबा रेल्वे गेट ते चांगदेव महाराज समाधी मंदिर,पुणतांबा केटी वेअर दुरुस्ती आदी कामांचा समावेश असून यापुढील काळात उर्वरित विकास कामे मार्गी लावण्यासाठी मी कटिबद्ध असून सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करून मोठ्या मताधिक्याने निवडून द्यावे असे आवाहन आ.आशुतोष काळे यांनी यावेळी केले.

  यावेळी गौतम बँकेचे माजी चेअरमन बाबासाहेब कोते, ज्येष्ठ नेते अॅड. मुरलीधर थोरात, शिवसेना (शिंदे गट)शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष धनंजय जाधव, माजी सरपंच डॉ. धनंजय धनवटे, राजेद्र धनवटे, सौ.संगीता भोरकडे, आण्णासाहेब कोते, गणेश थोरमोटे, बाळासाहेब चव्हाण, श्याम माळी, श्रीमती ऍड.संध्या थोरात, साहेबराव आदमाने, सुनील म्हसे, सुनील सांबारे, शाम जगताप,नितीन जगतापअर्जुन बोंबले,चंद्रकांत वाटेकरगणेश बनकर,सर्जेराव जाधव,राहुल धनवटे विजय धनवटेबाळासाहेब बाबुळखेपद्माकर सुरडकरभाऊसाहेब जाधवदीपक वाघ,नितीन वाघचौरे,सोपानराव वाघ,सोनाजी पगारेरघुनाथ वाघ,रुपेश गायकवाड,बाबासाहेब उगलेसुनील कोतेभाऊसाहेब लहारे ,रामकृष्ण चव्हाण सुनील,थोरात बबलू पऱ्हे,शाम धनवटे,विलास पेटकर आदी उपस्तित होते. यांची भाषणे झाली शिवसेनेचे चंद्रकांत वाटेकर ग्रामपंचायत सदस्य श्याम धनवटे भूषण वाघ संगीता भोरकडे सर्जेराव जाधव आदी मान्यवरांसह अकरा गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बातमी शेअर करणायसाठी येथे क्लिक करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!