सक्षम काम करणाऱ्या महायुतीचे उमेदवार ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा – धनश्रीताई विखे पाटील
सक्षम काम करणाऱ्या महायुतीचे उमेदवार ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा – धनश्रीताई विखे पाटील
लोणी । प्रतिनिधी ।
महायुती सरकारने अडीच वर्षात राज्यात सर्व समावेशक असे विकासाचे काम केले आहे. सरकार गोरगरीब जनतेचे आहे ही जाणीव विकास कामातून या सरकारने दाखवून दिले आहे. कुटुंब प्रमुख म्हणून सक्षम काम करणाऱ्या महायुतीचे उमेदवार आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्याने विजयी करा असे आवाहन रणरागिनी महिला मंडळाच्या अध्यक्षा सौ. धनश्रीताई विखे पाटील यांनी केले.
महायुतीचे उमेदवार आणि अहिल्यानगरचे पालकमंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रचारार्थ ममदापूर या ठिकाणी महिला आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधताना सौ धनश्रीताई विखे पाटील बोलत होत्या. यावेळी संवाद साधताना सौ विखे पाटील म्हणाल्या की, राज्य सरकारच्या माध्यमातून मंत्री विखे पाटील यांनी काम करत असताना शेतकऱ्यांचे प्रश्न, घरकुलासाठी जागा उपलब्ध करून देतानांच सर्वांना बरोबर घेऊन राजकारण नव्हे तर समाजकारणातून आपण शिर्डी मतदार संघाचे कुटुंबप्रमुख असल्याची जाणीव प्रत्येकाच्या मनामध्ये निर्माण केली आहे. जनसेवा फौडेशनच्या माध्यमातून वैयक्तिक लाभार्थ्यांच्या योजना घराघरापर्यंत पोहोचवण्याचे काम मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून झाले आहे. शिर्डी मतदार संघामध्ये विकासाबरोबरच जातीय सलोखा राखण्यातही मंत्री विखे पाटील यांनी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केले आहे. या भागांमध्ये सर्व समाज हा एका कुटुंबाप्रमाणे राहत आहे जातीपातीच्या राजकारणाला थारा न देता या भागामध्ये सर्वच घटक हे एकोप्याने राहत आहेत. महिलांच्या बाबतीमध्ये महायुती सरकारने अनेक महत्त्वपूर्ण निर्णय होऊन एसटी मध्ये 50% सवलत दिल्याने आता महिला भगिनी या एकाच पैशात दोनदा माहेरी जात आहेत ही एक मोठी उपलब्धी महिलांच्या दृष्टीने झाल्याचे सांगतानाच महिलांसाठी विविध योजना सुरू करणाऱ्या मंत्री विखे पाटील यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहण्याचा आवाहन सौ विखे पाटील करुन येणाऱ्या काळातही महिलांसाठी विविध योजना या सुरूच असणार आहे. निवडणुका आल्या की या भागामध्ये विकासावरती चर्चा करण्याऐवजी व्यक्तीदोषापोटी आरोप प्रत्यारोप होत असतात त्याला आता उत्तर आपण मतपेटीच्या माध्यमातून देत असतानाच हा मतदार संघ हा कुटुंबप्रमुख विखे पाटील यांच्यासोबत आहे यासाठी आता या भागातील महिलाच सक्रिय झाल्या असून त्यांनीच खऱ्या अर्थानं प्रचार आपल्या हातात घेऊन मंत्री विखे पाटील यांना विक्रमी मताधिक्य देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे.
यावेळी महिलांनी मंत्री विखे पाटील यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या विविध योजनांची माहिती देत असतानाच आम्ही सर्व लाडक्या बहिणी लाडक्या भावासोबत कायम असून आमच्यामध्ये मतभेद निर्माण करण्याचं काम करू नका अन्यथा जशास तसे उत्तर आम्ही देण्यास समर्थ असल्याच्या भावनाही महिलांनी बोलून दाखविल्या. ममदापूर येथील मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांनी देखील मुस्लिम समाजाला योग्य तो सन्मान आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचे काम मंत्री विखे पाटील यांनी अनेक वर्षापासून केले आहेत या भागामध्ये कुटुंब प्रमुख म्हणून मुस्लिम समाज हा कायमच विखे पाटलांसोबत असून मुस्लिम समाजाचे विक्रमी मताधिक्य मंत्री विखे पाटील यांना देण्याची ग्वाही देखील मुस्लिम कार्यकर्त्यांनी यावेळी दिली. कार्यक्रमास ममदापूर येथील महायुतीचे विविध पदाधिकारी त्याचबरोबर महिला युवक युवती मोठ्या संख्येने उपस्थित होते.