निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना २० एप्रिल पासुन आवर्तन सुरू करण्याच्या सूचना
लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळण्याच्या दुष्टीने आवर्तनाचे नियोजन करा - जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना २० एप्रिल पासुन आवर्तन सुरू करण्याच्या सूचना
लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळण्याच्या दुष्टीने आवर्तनाचे नियोजन करा – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
लोणी । प्रतिनिधी । निळवंडे लाभक्षेत्रातील डाव्या आणि उजव्या कालव्यांना २०एप्रिल २०२५ पासून उन्हााळी हंगामातील आवर्तन सुरू करण्याच्या सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.लाभ क्षेत्रातील शेवटच्या शेतकर्याला पाणी मिळण्याच्या दुष्टीने आवर्तनाचे नियोजन करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत.

मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी निळवंडे धरणाच्या प्रकल्प अधिकार्यांकडून धरणातील पाणी साठयाची सद्यस्थिती जाणून घेतली.या हंगामातील दुसरे आवर्तन सुरू करण्याची कार्यवाही करण्याचे निर्देश मंत्री विखे पाटील यांनी दिले आहेत.उन्हाची वाढती तीव्रता लक्षात घेवून पिण्याच्या तसेच शेतीच्या पाण्याची मागणी लाभ क्षेत्रातून मोठ्या प्रमाणात करण्यात येत होती.त्यानूसार धरणातील २टिएमसी पाण्याचे नियोजन या आवर्तनासाठी करण्यात येणार असल्याचे कार्यकारी अभियंता कैलास ठाकरे यांनी सांगितले.

या आवर्तनाचा मोठा दिलासा लाभक्षेत्रातील शेतकरी तसेच ग्रामस्थांना होणार आहे.कालव्याच्या माध्यामातून सोडण्यात येणारे चौथे आवर्तन असून यापुर्वी आवर्तनाचे पाणी शेवटच्या गावपर्यत मिळेल असे नियोजन जलसंपदा विभागाने केले होते.यंदाच्या आवर्तनातही तसेच नियोजन करून पाण्याचा अपव्यय होणार नाही याची दक्षता अधिकार्यांनी घेण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी दिल्या आहेत.या आवर्तनातून लाभक्षेत्रातील गावांचा पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या दूर होणार असून पाणी पुरवठा योजनांसाठी शेती पिकांसाठी आणि जनावारांच्या पिण्याच्या पाण्यसाठी आवर्तनाची मोठी मदत होईल.